अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार..
रजनीकांत पाटील
अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र दररोज जोरदार पाऊस होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. मूग, उडीद ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. ज्वारी बाजरी ची कणसे काळी पडली होती. तसेच अतिवृष्टीमुळे कपाशीचाही फुलपाकली गळून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र परतीचा पाऊस ही जोरदार व दररोज होत असल्याने त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे दोन्ही हंगाम वाया जावून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदाही तीच परिस्थिती ओढवते की काय अशी भीती आता बळीराजाला वाटू लागली आहे. तोंडावर आलेला घास जाणार की काय ही चिंता भासू लागली.






