Amalner

मतदार नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आवास फाउंडेशन अमळनेर यांचा उपक्रम

मतदार नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आवास फाउंडेशन अमळनेर यांचा उपक्रम

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : जळगाव जिल्हा प्रशासनाकडून मतदार नोंदणीची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. दि.15 डिसेंबर पर्यंत नवीन मतदारांची नोंदणी केली जाणार असून परीसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतले. तसेच युवा मतदारांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आवास फाउंडेशनकडून परीसरात मतदार नोंदणी अभियान राबविले गेले.यादी भाग क्रमांक १५९ , १६० , १६१ , १६२ , मधील जीनगर गल्ली, बेलदार मोहल्ला, ऐकता नगर, कुरैशी मोहल्ला, डाँ आंबेडकर भवन,राजवाडा, अंदरपुरा मोहल्ला, फरशी रोड,सराफ बाजार,बागवान गल्ली, ह्या भागातील नवीन मतदार नोंदणी व मतदार नाव पत्ता दुरूस्ती चे शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
आवास फाऊंडेशनच्या वतीने शासनाच्या विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्याचे संकल्पना घेऊन नवीन मतदार नोंदणी व मतदार दुरूस्ती चे शिबीर सराफ बाजार अंदरपुरा येथे दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होते अतिशय चांगल्या प्रकारे या शिबिराला प्रतिसाद मिळाले स्वता: हुन नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी व मतदार दुरुस्ती करून घेतली शिबिरासाठी आवास संस्थेचे अध्यक्ष अशपाक शेख, सचिव नविद शेख, सैय्यद अहेमद अली, जमालोदीन शेख, मजहर शेख, व रौनक सर, तौसिफ शेख, सह आदिंनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button