Chandwad

चांदवडला सोशल मीडियात दिवाळीतही पाणी वॉर

चांदवडला सोशल मीडियात दिवाळीतही पाणी वॉर

चांदवड उदय वायकोळे

चांदवड शहरात ऐन दिवाळी सणात सुद्धा दहा दिवस नंतर पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये सोशल मीडियात पाणी वॉर सुरू झाले आहे.ह्या वर्षी पाऊस चांगला झालेला असला तरी काही भागात 9 ते 10 तर कधीकधी 15 दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो अश्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर नागरिक मांडत आहेत.चांदवड नगरपरिषद प्रशासनाने सुरळीत व वेळेवर पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
याविषयी चांदवड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री अभिजित कदम यांनी मेसेज द्वारे कळविले आहे की चांदवड शहरास होणारा पाणीपुरवठा ओझरखेड येथे High voltage मुळे pumping दिनांक 10/11/2020 पासून बंद आहे. सदर तांत्रिक अडचण ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक व महावितरण, वणी सबस्टेशन यांची असून अद्याप सदर प्रॉब्लेम अजून सुरळीत झालेला नाही. चांदवड शहरास होणार्‍या पाणीपुरवठ्यास वेळ होण्याची शक्यता आहे.
याबाबत विशेष बाब म्हणजे बच्छाव नामक व्यक्तीने तर नाशिक महानगरपालिका घराची नळ पट्टी व चांदवड नगरपरिषद कडून आकारण्यात येणारी नळ पट्टी यातील फरक सोशल मीडियावर शेयर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.असो दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात पाणीपुरवठा सुरळीत व वेळेवर होणे हेच नागरिकांना महत्वाचे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button