शहीद जवान भिवा खंडू वाघमोडे यांच्या कुटुंबियांची होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांनी घेतली भेट
पुणे प्रतिनिधी दत्ता पारेकर
भरतगाव (ता. दौंड) येथील शहीद जवान भिवा खंडू वाघमोडे यांच्या कुटुंबियांची होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
२७ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दापोडी येथील मिलिटरी इंजिनीअरिंग स्कूलमध्ये (सीएमई) पूल बांधणीच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातात भिवा वाघमोडे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली.
होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी वाघमोडे कुटुंबीयांची आज भेट घेतली. शहीद जवान भिवा वाघमोडे यांच्या आई, भाऊ, पत्नी बहीण यांचे सांत्वन केले.
जवान भिवा वाघमोडे यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असे म्हणत, त्यांना सर्वोत्त परी मदत करण्याचे आश्वासन यावेळी होळकर यांनी दिले. यावेळी मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष सुरेश महारनवर, दौंड तालुका भाजपचे अध्यक्ष गणेश आखाडे, श्रीकांत हंडाळ, देविदास डुबे, महेश गडधे, सरपंच विकास हाके, सावळाराम हाके आदींसह भरतगावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.






