Faijpur

फैजपुर बस स्थानकावरून एसटीची पार्सल सेवा सुरू

फैजपुर बस स्थानकावरून एसटीची पार्सल सेवा सुरू

सलीम पिंजारी

फैजपूर :कोरानाच्याप्रादुर्भावामुळे गेली पाच महिने बंद असलेली एसटी पार्सल सेवा येथील बसस्थानकातून पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. व्यापारी व व्यावसाईक यांची पार्सल पाठवण्याची सोय झाल्यामुळे व्यापारी वर्गातून दिलासा व्यक्त केला जात आहे. संपुर्ण महाराष्ट्रात अति जलद व खाजगी पार्सल वाहतुकीपेक्षा निम्या दरात एसटी महामंडळाकडून पार्सल पाठवण्याची व्यवस्था आहे. कोरोनोच्याप्रादुर्भावामुळे
शासनाने रोगाचा प्रसार होवू नये. म्हणून राज्यातील बस सेवा व पार्सल सेवा गेली पाच महिन्यापासून बंद केली होती. त्यामुळे लघुउद्योग व व्यापारी
यांची पार्सल पाठवण्यास अडचण झाली होती. सध्या महामंडळाने जिल्ह्याबाहेर बस सेवा सुरू केल्याने पार्सल सेवा सुरूझालीआहे.त्यामुळेव्यवसाईकांना दिलासा मिळाला आहे. येथील बसस्थानकात ही सेवासुरू झाल्याचे गुणिना कमर्शिअल कंपनीच्या पासर्ल कार्यालयाचे जयेश सरोदे यांनी कळवले आहे. तरी व्यापारी,उद्योजक,छोटेव्यवसाईक, नागरीकआता आपल्या कौटुबिकमित्रमंडळीनालग्नसोहळा,नवरात्र, दसरा, दिवाळी अशा अनेक उत्सवावेळी पार्सल पाठवूशकतात. पार्सल सेवा अत्यंतजलद व माफक दरातउपलब्धआहे.त्याचालाभ घ्यावा. असेआवाहन सरोदे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button