सिल्लोडमधील जलसिंचन बळकटीकरणासाठीची कार्यवाही तातडीने करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यासह आसापासच्या सर्व गावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होण्यासोबत जलसिंचन बळकटीकरणासाठीची आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश आज महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिन विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले.
सिंचन भवन येथे आयोजित सिल्लोड तालुक्यातील जलसिंचन आढावा बैठकीत राज्यमंत्री सत्तार बोलत होते. या बैठकीस के. बी. कुलकर्णी, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद, डी.बी. तवार, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग औंगाबाद, मनोज अवलगावकर,अधीक्षक अभियंता, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औंगाबाद, यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री सत्तार म्हणाले, सिल्लोड तालुक्याच्या क्षेत्रफळानुसार हक्काचे पाणी तालुक्यास मिळालेच पाहिजे त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातुन तालुक्याला आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासाठीची कार्यवाही कालमर्यादेत पूर्ण करावी. असे निर्देश दिले आहेत.






