Faijpur

नागरिकांना कायद्याची माहिती होणे अत्यंत गरजेचे न्यायाधीश व्ही एस डांबरे

नागरिकांना कायद्याची माहिती होणे अत्यंत गरजेचे न्यायाधीश व्ही एस डांबरे

फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

लक्कड पेठ चा राजा वंदनीय गणेश मंडळात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व श्रीगणेशाची महाआरती संपन्न
बुधवारी संध्याकाळी तालुका विधी सेवा समिती यावल वंदनीय गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल न्यायालयाचे न्यायाधीश एम एस बनचरे होते. न्यायाधीश व्ही एस डांबरे, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर, एडवोकेट किशोर सोनवणे, एडवोकेट नितीन भावसार, एडवोकेट यशवंत दाणी, एडवोकेट आकाश चौधरी, चंद्रशेखर चौधरी, प्रभाकर चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
नागरिकांना कायद्यांची माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांविषयक कायदे,जेष्ठ नागरिक देखभाल कल्याण कायदा, खावटी, घरगुती हिंसाचार, कुटुंब विभक्त कायदे, आर्थिक क्षमता पालन-पोषण याविषयी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांनी माहिती दिली.
न्यायाधीश एम एच बनचरे यांनी कायदे भरपूर आहेत. कायद्यांची माहिती होणे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं जामीनपात्र अजामीनपात्र गुन्हा, ज्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे ती व्यक्ती पॅनल वरील वकील यासाठी अर्ज करू शकतात असे बनकर यांनी सांगितले
कायदेविषयक शिबीरनंतर न्यायाधीश एम एस बनचरे, व्ही एस डांबरे यांनी गणेशाची आरती केली.
कार्यक्रमाला नंदकिशोर अग्रवाल पी एल व्ही अनंत नेहेते,रविंद्र होले डी के मोरे, हेमंत चौधरी, डॉक्टर गिरीश लोखंडे, व महिला भाविक भक्तगण बाल गोपाल यांची उपस्थिती होती.
शिबिरासाठी रितेश चौधरी, जितेंद्र वाघुळदे जीवन चौधरी, राजेश चौधरी, धीरज चौधरी, राहुल बोरोले, मयूर बोरोले, विवेक चौधरी, निलेश पाटील, सिद्धेश नेहेते, कल्पेश महाजन, तुकाराम बोरोले, नितीन बोरोले, दिपक होले, भूषण चौधरी, मनोज चौधरी, यांनी सहकार्य केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button