अमळनेर येथील चार अहवाल प्राप्त…. दोन पाॅझीटीव्ह तर दोन अहवाल निगेटीव्ह..
रजनीकांत पाटील
अमळनेर :- तालुक्यातील चार अहवाल आता प्राप्त झाले असून त्या दोन रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे.
सदर पाॅझीटीव्ह रुग्ण हे बोरसे गल्ली (मयत) ६५ वर्षीय पुरुष तर सिंधी काॅलनी भागातील ५४ वर्षीय पुरुष आहेत.तर ताडेपुरा येथील ५७ वर्षीय पुरुष व भागवत रोड वरील ७४ वर्षीय पुरुषाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तसेच नऊ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.






