Amalner

शासनाच्या निर्णयाने “होमगार्ड “कर्मचारी बनले बेरोजगार

शासनाच्या निर्णयाने “होमगार्ड “कर्मचारी बनले बेरोजगार

उमाकांत ठाकूर

अमळनेर:कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ५० वर्षे वयावरील होमगार्ड कर्मचारी यांना डयूटीवर तैणात करू नये असा शासनाचा आदेश असून त्यामुळे अमळनेर तालुक्यात होमगार्ड कर्मचार्‍यांवर ऊपामारीचे संकट ओढवले आहे.

अमळनेर तालुक्यात पोलीसांची कमतरता असून कायदा व सुवस्था राखण्यासाठी पोलीसांच्या मदतिला सुमारे १४० होमगार्ड कर्मचारी आहेत.जेव्हा जेव्हा होमगार्ड कर्मचार्‍यांना बंदोबस्तसाठी तैणात केले जाते तेव्हा त्यांना मानधन दिले जाते. मात्र कोरोना संकटाच्या काळात शासनाने निर्णय घेवून ५० वर्षावरील होमगार्ड जवानांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सक्तीची सुट्टी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे होमगार्ड कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने निदान मानधन दयावे अशी मागणी होत आहे.
याबाबत अमळनेर तालुका हौमगार्ड समावेशक नेतकर यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button