Kolhapur

माणुसकी,प्रेम,जिव्हाळा जपणारे दादासाहेब लाड

माणुसकी,प्रेम,जिव्हाळा जपणारे दादासाहेब लाड

सुभाष भोसले,कोल्हापूर
दसरा,सीमोलंघन,ग्रामदेवतांच दर्शन ह्या आपल्या परंपरा…आपल्याला खूप आवडतात..या वर्षीचा दसर्‍याचा दिवस दादांनी साजरा केला शाहूवाडी तालुक्यात…निसर्गाच वरदान लाभलेला, माणुसकी,प्रेम,व जिव्हाळा यांचा त्रिवेणी संगम असलेला हा तालुका. दादासाहेब लाड यांच गाव याच तालुक्यातील चरण..प्रल्हाद पताडे व दादासाहेब लाड दसर्‍यादिवशी सरांच्या गावी गेले.देवी चरणाईच दर्शन घेतल,मनोभावे नमस्कार केला…अनेक गावकर्‍याना भेटले गावाकडची माणस,त्यांच्यातील माणुसकी पाहायला मिळाली…खरतर दादासाहेबांच शाहुवाडी तालुक्यावर खूप प्रेम…..तालुक्यातील अनेक राजकीय ,सामाजिक घडामोडीचे साक्षीदार पण गट तट बाजूला ठेवून सर्वांशी आदराने वागणे हा त्यांचा स्वभाव पहायला मिळाला.बांबवड्याच्या शालेय जीवनातल्या गोष्टी असोत नाहीतर सरूडातील काॅलेज जीवन खूप आठवणी सांगितल्या,सरूड मधील भोई समाजातील काटकर,आपटे कुटुंबान त्यांचा केलेला भावनिक सत्कार मनाला खूप विलोभनीय होता.. प्रल्हाद पताडे यांचा काही संबंध नसताना त्या कुटुंबान सत्कार केला…गप्पा गोष्टी राजकारण,याबरोबर दांदानी प्रत्येकाची आपुलकीन केलेली चौकशी आनंद देणारी होती…हजर नसलेल्या ही शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शाळेविषयी,कौटुंबिक बाबीविषयी भेडसगावचे जनार्धन गुरव यांच्याकडे आस्थेवाईक पणे चौकशी केली श्री गुरव .यांनीही त्याच्यासाठी वेळ काढला स्वर्गीय संजयदादा,स्वर्गीय भेडसगावकर तात्या,स्वर्गीय गणपतराव थोरात,यांच्या जुन्याजाणत्या माणसांच्या आठवणी चर्चेत निघाल्या…खूप छान वाटल..माणसातला माणूस म्हणजे दादासाहेब लाड एवढच वर्णन जनार्धन गुरव यांनी केल..त्यांच्या पाहुणचाराबद्दल आणि दादांच्या वरील प्रेमाबद्दल..प्रल्हाद पताडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button