शिरूड गावातून शहराकडे जाण्याचा संपर्क तोडावा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी मार्ग मोकळा ठेवा नागरिकांची मागणी
रजनीकांत पाटील
अमळनेर तालुक्यात कोरोनाचे आजराने चांगलेच थैमान घातले असता अमळनेर तालुक्यात कोरोनाने शतक ओलांडले असून ग्रामीण भागात नागरिकांना चांगलीच धास्ती वाटू लागली आहे कोरोना बाबतची तालुक्यातील शिरूड गावातील नागरिकांना चिंता होत आहे.
शिरूड परिसरातील बरेच नागरिक अमळनेर शहरात राहत असत काही कारनास्थ तर काही नागरिक विनाकारण गावात फेरफटका मारतात त्यात काही नागरिक गावातून देखील अमळनेर शहरात जाण्यासाठी काहीही कारणे दाखवुन शहराकडे धाव घेतात या बाबत अमळनेर तालुक्यातील शेकडो नागरिकांची गावातील वर्दळ होत असते अमळनेर शहरातुन कोण कधी आले व कशा साठी आले व कुठून आले याचा काही अता पता नसतो या गोष्टींकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.
शहरापासून गाव 9 की.मी अंतरावर आहे या मुळे गावात कोरोना तर शिरकवणार नाही याची चांगलीच धास्ती आता शिरूडकरांना वाटू लागली आहे यावर गावातील नागरिकांचे म्हणने असून शहरातून खेड्यात व खेड्यातुन शहरात जाण्याचा संपर्क बंद करावा अत्यावश्यक सेवेलाच परवानगी दावी विनाकारण फिरणाऱ्यांसाठी प्रवेश बंद ठेवावा मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे या साठी गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनी खचून प्रयत्न करावा व ग्रा.पं सदस्य यांनी देखील पाठबळ द्यावे.






