Chalisgaon

आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांच्या १० वी व १२ वी परीक्षांमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सत्कार

आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते कृष्णापुरी तांडा – लोंढे येथील बंजारा समाजातील ऊसतोड कामगारांच्या १० वी व १२ वी परीक्षांमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सत्कार

चाळीसगाव प्रतिनिधी नितिन माळे

व सोबतच कृष्णापुरी येथील धरण १०० टक्के भरल्याने त्याचे जलपूजन देखील आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, सरचिटणीस अमोल चव्हाण, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, कैलास पाटील, सुनील जिभाऊ, भोला पाटील, भोसले सर, मुख्याध्यापक सोनवणे सर, निकम सर, रुपेश जाधव, भाईदास सर, नितीन पवार आदी उपस्थित होते.

यावेळी मंगेशदादा चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. बंजारा समाजातील बहुतांश कुटुंब ही परजिल्ह्यात व परराज्यात ऊसतोडणी साठी जात असल्याने बऱ्याच मुलं – मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटते. मात्र आता उशिरा का होईना समाजातील तरुण वर्गाने केलेल्या जनजागृती मुळे ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. विशेषतः बंजारा समाजातील तरुणींनी शिक्षणात पुढे येणे गरजेचे असून पुढील काळात तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत असेन असा विश्वास आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button