Pune

वाफगावात महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक दिन थाटामाटात साजरा

वाफगावात महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक दिन थाटामाटात साजरा

दत्ता पारेकर पुणे

पुणे : पुणे जिल्ह्यातील वाफगाव ता .राजगुरू येथे महाराजा यशवंतराव होळकर राज्य दिन सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. महाराजा यंशवराव यांचा जन्म याच वाफगावाच्या भुईकोट किल्यात झाला होता. महाराजा यशवंतराव यांनी इंग्रजांचा सलग १८ वेळा पराभव केला होता त्यांनी ६ जानेवारी १७९९ रोजी महेश्वर येथे राज्यभिषेक करवुन घेतला होता त्याच दिवसाची आठवण म्हणून या वर्षी मोठ्या प्रमाणात हा सोहळा वाफगावात घेण्यात आला

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे होळकर घराण्याचे राजवशंज श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर त्यांचे स्वागत गावाच्या वेशीवर करण्यात आले त्यांची पारंपरिक वाद्याच्या सुरात त्यांना क्रार्यक्रम स्थळी आणण्यात आले व नंतर राजराजेश्वर मंदीरात अभिषेक करण्यात आला व नंतर गडीचे पुजन करण्यात आले व सदरेवर श्रीमंत भुषणसिंहराजे यांच्या हस्ते राज्याभिषेकाचे सर्व विधी पार पडले. त्यानंतर राजेचा सन्मान मरह्टी संशोधन विकास मंडाळाच्या वतीने होळकर पगडी व तलवार देवुन करण्यात आला. त्यानंतर तळी भंडाराचा विधी पार पडला व अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्राचे आणावरण करण्यात व नवनियुक्त प्रशाकिय अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला शेवटी श्रीमंत भुषणसिंह राजे यांचे मनोगत व्यक्त केले त्यांनी भारतातच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या व्यक्तीचे आभार मानले व सरकारला इशारा दिला कि रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असलेला किल्ला सरकारच्या ताब्यात घ्यावा आणी त्याचे संवर्धन करावे.

राज्याभिषेक सोहळ्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यशपाल भिंगे सुरेशभाऊ कांबळे उज्वला हाके महेंद्र रेडके पांडुरंग मारकड माऊली चौरे घनश्याम हाके मरह्टी संशोधन विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button