रावेर

८ नोहेंबर ला नोट बंदी झाली होती तो लुटारु दिवस म्हणुन वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ रावेर यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

८ नोहेंबर ला नोट बंदी झाली होती तो लुटारु दिवस म्हणुन वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ रावेर यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

रावेर प्रतिनिंधी विलास ताठे

भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेद्रजी मोदी साहेबांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचा आज ८ नोहेंबर ला दोन वर्ष पुर्ण होत आहे. या निर्णयाने समाजातील विविध समाज घटकांना जो फ़टका बसला त्यातुन अजुनही देश सावरलेला नाही. म्हणुन नोटबंदी झाली होती तो लुटारु दिवस म्हणुन वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ रावेर यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संपुर्ण महाराष्ट्रामध्ये अति वृष्टीमुळे झालेल्या शेतक-याचे नुकसान भरुन निघणार नाही. म्ह्णुन संपुर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतक-यांना सरसकट एकरी ५०.००० रुपयाचे पिकाची नुकसान भरपाई मिळावी. आणि ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजना यांचा निधी लाभार्थ्यांना तात्काळ मिळण्यात यावा.

तसेच sc, st, obc, vgnt, या विद्यार्थयांना मागिल ब-याच वर्षापासुन कॉलरशिप ( शिष्यवृती ) मिळाली नसुन ती तात्काळ मिळावी, संजय गांधी,श्रावण बाळ, वृद्धापकाळ, निराधार योजना गरजु लोकांना तात्काळ मिळण्यात यावी.

नोकर भर्ती तत्काळ करण्यात यावी, खाजगिकर तत्काळ बंद करण्यात यावी, तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना ५०००-/ प्रमाणे मानधन सुरु करण्यात यावे या मागण्यांची तात्काळ अंमलबजावनी करण्यात यावी अंन्यथा वंचीत बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघ यांच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.निवेदनावर बाळू राजाराम शिरतुरे रावेर ता.अध्यक्ष,नितिन अशोक अवसरमल ता.संघटक,सलिमशाह याशिमशाह,ता.उपाध्यक्ष नरेद्र कैलास करवले ता.सचिव अर्जुन् सुधाकर वाघ ता.सह संघटक विनोद तायडे कोषाध्यक्ष, सुरेश कडू अटकाळे ता.उपाध्यक्ष,‍सतिष काकडे,जिवन पाटील,‍निलेश अवसरमल,नितीन तायडे, अतुल तायडे भीमराव तायडे,‍ सदाशीव निकम, गोकुळ अटकाळे, विजय धनगर, दिलीप पानपाटील आदींच्या निवेदनावर सहया आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button