Aurangabad

विरगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळु वाहतुक सुरुच; पोलीस ठाण्यातील अधिकारी करतात जाणुन बुजून दुर्लक्ष

विरगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळु वाहतुक सुरुच; पोलीस ठाण्यातील अधिकारी करतात जाणुन बुजून दुर्लक्ष
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील विरगांव पोलीस ठाण्यातील हद्दीत अवैध वाळु वाहतुकीचे धंदे बोकाळले असुन विरगांव ठाणे प्रमुखांची या वाळु माफियांवर खास मेहरनजर असल्यामुळे वाळु माफियांचे चांगलेच फापावत आहे. विरगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळु वाहतुक सुरु असल्याने विरगांव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरगांव पोलीस ठाण्याचा कारभार पाहता सध्या ठाणेप्रमुखांसह कर्मचारी वर्गाला सुगेचे दिवस आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळु वाहतुक सुरु असल्याने महसुल विभाग व तहसीलदार यांनी या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी ये जा करत असतांना आठ ते दहा दिवस सर्व वाळु माफियांकडुन अवैध वाळु वाहतुक बंद करण्यात आली होती. पेट्रोलिंग बंद झाल्याने अवैध वाळु वाहतुक जोमाने सुरू करण्यात आली आहे. याकडे विरगांव पोलीस ठाणे प्रमुखांचे जानुन बुजून दुर्लक्ष आहे का? गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळु वाहतुक सुरु असुन या विषयी विरगांव ठाणे प्रमुखांना माहिती असु नये का असा भाबडा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्यावाचुन राहत नाही.
गोदावरी नदीच्या पात्रातून होणारी अवैध वाळु वाहतुक बंद करण्यात यावी तसेच विरगांव पोलीस ठाण्याचा कारभार एका डॅशिंग ठाणेप्रमुखांना देण्यात यावा अशी मागणी विरगांव हद्दीतील गावातील सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button