India

Crime Story…प्रेम..प्रियकर… प्रेयसी..खून..आणि मटण सूप..!

Crime Story…प्रेम..प्रियकर… प्रेयसी..खून..आणि मटण सूप..!

तमिळनाडू नेहमीच प्रेम प्रकरणे आणि त्या संबंधित नात्यांमुळे अनेक प्रकारचे गुन्हे घडतात.पण शेवटी असे म्हणतात की कितीही शातीर गुन्हेगार असो किंवा कितीही चतुराईने गुन्हा घडलेला असो कायदा आणि पोलीस विभागातील मोजक्या उत्कृष्ट आणि इमानदार पोलीस अधिकारी तो आरोपी नक्की शोधून काढतात.असाच एक अजब गजब गुन्हा आणि त्याचे आरोपी पोलिसांनी शोधून काढले अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथे प्रमाणे ह्या घटना घडल्या आहेत..चला तर मग अश्या एका केसबद्दल जाणून घेऊ की त्या केसची उकल झाली ती एका मटण् सूपमुळे. स्टोरी थोडी फिल्मी आहे पण वास्तवात घडली आहे..

तमिळनाडू तील नागरकोईल ह्या भागातील ही वास्तविक घटना आहे. एम. स्वाती ह्या युवतीच लग्न सुधाकर रेड्डीबरोबर झालं होतं. दोघांना दोन मुलं देखील झाली. ती नागरकॉइल इथं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. तिथं तिचं फिजिओथेरेपिस्ट असलेल्या राजेशबरोबर प्रेम होतं.

या प्रेमप्रकरणातून दोघांनी मिळून सुधाकर रेड्डीचा खून करण्याचा प्लॅन आखला. प्लॅन असा की, सुधाकरला जाळून मारायचं आणि राजेशची प्लास्टिक सर्जरी करून त्याला सुधाकर बनवून घरच्यांसमोर उभं करायचं. सगळं काही प्लॅननुसार झालं.
सुधाकरला अनेस्थेशिया देऊन त्याच्या डोक्यात मारण्यात आलं. त्याचा जीव गेल्यावर त्याला जंगलात नेऊन जाळण्यात आलं. यानंतर राजेशच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकून त्याला विद्रूप केलं गेलं, जेणेकरून कोणालाही त्याला ओळखता येऊ नये. यानंतर दोघांनी हा एक अज्ञातांकडून झालेला अॅसिड हल्ला होता असं सुधाकरच्या घरच्यांना सांगितलं.
सगळं काही बरोबर होत असतानाच एकदा नको ते घडलं. राजेश सुधाकर बनून हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता, त्याच्यावर उपचार चालू होते. हॉस्पिटलमध्ये भाजलेल्या रुग्णांना मटण सूप दिलं जात होतं. हे मटण् सूप घ्यायला राजेशने नाही म्हटलं. ही होती साधीच गोष्ट, पण तिने गोष्टीला वेगळं वळण दिलं. मटण् सूप नाकारण्याचं कारण सुधाकर उर्फ राजेशने असं दिलं की तो शाकाहारी आहे. इथेच सगळा घोळ झाला!!
सुधाकरच्या घरच्यांना शंका आली कारण सुधाकर मांसाहारी होता. यावर भरीस भर म्हणजे राजेशच्या वागण्यातून तो सुधाकर असल्याचं कुठूनही दिसत नव्हतं. याच शंकेतून सुधाकरच्या कुटुंबाने पोलिसांना बोलावलं आणि बाकीचं काम पोलिसांनी केलं. या दोन्ही प्रेमी युगुलाने आपला गुन्हा काबुल केला.
स्वातीने आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे की तिने एका तेलगु सिनेमातून ह्या गुन्ह्याची प्रेरणा घेतली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button