Chandwad

चांदवडला चोऱ्यांचे सत्र सुरूच,डावखरनगर मधून कार चोरीला

चांदवडला चोऱ्यांचे सत्र सुरूच,डावखरनगर मधून कार चोरीला

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहरात सध्या चोऱ्यांचे सत्र सुरू असून मंदिरातील देवांचे दागिने चोरण्यापासून मोटारसायकल चोरी होतच होती.मात्र चांदवड शहरातील डावखर नगर भागातून कार चोरीला गेल्याने मात्र नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री गोकुळ बबनराव देवरे रा डावखर नगर चांदवड यांनी दि 07/02/2023 रोजी चांदवड पोलीस स्थानकात कार चोरी झाल्याची तक्रार दाखल केली असून मारुती कंपनीची अल्टो कार क्रमांक MH15BX0448 चोरी झाल्याचे त्यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादिवरून समजते.
काही दिवसांपूर्वी नगरपरिषद वाचनालय तसेच बाजारपरिसर आदी ठिकाणांहून सुद्धा मोटारसायकल चोरी झाल्याचे समजते.रहिवासी वस्तीतून चोरटे गाड्या चोरण्याची हिम्मत करतात याचा अर्थ पोलीस प्रशासनाने अंकुश ठेवणे गरजेचे आहे हे मात्र तितकेच खरे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button