Faijpur

फैजपुर पत्रकार संस्था तर्फे पत्रकार बांधवांना भेटवस्तू देऊन सन्मान

फैजपुर पत्रकार संस्था तर्फे पत्रकार बांधवांना भेटवस्तू देऊन सन्मान

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

फैजपूर प्रतिनिधी: मराठी पत्रकार दिनानिमित्त काल दि.०६ रोजी फैजपूर पत्रकार संस्था च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही फैजपुरशहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सत्कार करण्यात आला. फैजपूर येथील पत्रकार संस्था मौलाना अब्दुल कलाम आझाद कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी पत्रकारितेचे पितामह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन फैजपूर प्रांत अधिकारी कैलास कडलक व मुख्यधिकारी वैभव लोंढे फैजपूर नगर परिषद यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रात अधिकारी कैलास कडलक फैजपूर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर जी.पी.पाटील सर पत्रकार प्राध्यापक उमाकांत पाटील यांनी यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले यावेळी. प्रांताधिकारी कैलास कडलक फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी सर्व पत्रकार बांधवांना भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ व देऊन सन्मानित केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, ज्येष्ठ पत्रकार वासुदेव सरोदे, पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष फारुख शेख, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम पिंजारी, योगेश सोनवणे, संजय सराफ, प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.उमाकांत पाटील, पत्रकार संरक्षण समितीचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजु तडवी, शाकीर मलिक, नंदकिशोर अग्रवाल निलेश पाटील, मयूर मेढे, हमीद शेख समीर तडवी, मुबारक तडवी, शाकीर खान, शेख रज्जाक, शेख आरिफ, अरमान तडवी,शेख आरिफ शेख रशीद, मोईनुद्दीन इब्राहिम तडवी.उपस्थीत होते. सुत्रसंचलन राजेंद्र राजपूत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन फैजपूर पत्रकार संस्था अध्यक्ष शेख फारुख यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button