Chalisgaon

परिस्थितीची लढायला शिका – मंगेश चव्हाण विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, विद्यार्थ्यांनी केल्या भावना व्यक्त.

परिस्थितीची लढायला शिका – मंगेश चव्हाण
 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, विद्यार्थ्यांनी केल्या भावना व्यक्त.

परिस्थितीची लढायला शिका - मंगेश चव्हाण विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, विद्यार्थ्यांनी केल्या भावना व्यक्त.

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
जीवन सुंदर आहे ते परिश्रमातून, अनुभवातून अधिक फुलवता येते. आपली परिस्थिती गरिबीची आहे. म्हणून खचून न जाता, आहे त्या परिस्थितीला तोंड देत परिस्थितीशी लढायला शिका असे आवाहन युवानेते मंगेश दादा चव्हाण यांनी तालुक्यातील खडकी बु. भागातील दुवामहल परिसरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेत मंगेशदादा चव्हाण मित्र परिवारातर्फे विद्यार्थ्यांना  दप्तर वाटपाच्या कार्यक्रमात केले. यावेळी व्यासपीठावर 
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेशदादा चव्हाण, उपसरपंच मुश्ताक खाटीक, माजी उपसरपंच मुराद पटेल, दयान खाटीक, रमजान खाटीक, अजय जोशी, भुषण पाटील, खुशाल पाटील, दिपक राजपूत, मुख्याध्यापक उपस्थित होते.
पुढे मंगेश चव्हाण म्हणाले की, संघर्षातून निर्माण झालेला माणूसच नवे विश्व निर्माण करू शकतो कारण संकटांना पेलण्याची ताकद त्यांच्या अंगी असते. आपल्या गरिबीचा कधीही बाऊ करून घेऊ नका या जगण्यावर देखील प्रेम करा. शिक्षण घेऊन पाहिलेले स्वप्नचा पाठलाग करण्यापूर्वी त्या धेय्यचा पूर्णपणे पाया भक्कम करून आकाशी झेप घ्या. शिका सरकारी अधिकारी व्हा, समाजाला तुमच्या सारख्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे.कारण अशाच अधिकाऱ्यांना तळागाळातील प्रश्न समजतात.त्याचबरोबर आई वडिलांचे चांगले आधार बना.आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व प्रचंड आहेत.त्यामुळे खूप शिका असे मार्गदर्शन मंगेश चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे आभार मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराने मानले.

परिस्थितीची लढायला शिका - मंगेश चव्हाण विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, विद्यार्थ्यांनी केल्या भावना व्यक्त.

विद्यार्थांचे मनोगत भावले.
दप्तर वाटप कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने आपली परिस्तिथी मांडत मिळालेल्या दप्तराचा आनंद व्यक्त केला. त्याच्या हे मनोगत उपस्थितांना भावले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button