पारोळा कुटीर रुग्णालय येथे सॅनिटायझेशन टनेलचे लोकार्पण
पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी
कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता श्री. संताजी जगनाडे महाराज संस्थेचे अध्यक्ष तसेच कोमल मेडिकल चे मालक मा.प्रवीणभाऊ चौधरी यांच्या सौजन्याने पारोळा कुटीर रुग्णालयास सॅनिटायझेशन टनेल चेंबरचे लोकार्पण केले. लोकार्पण सोहळ्यात पारोळ्याचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे आरोग्य अधिकारी योगेश साळुंखे,डॉक्टर निखिल बोरा,कर्मचारी राजू सोनार,अजय घाटायडे, नगरसेवक कैलास चौधरी (भैय्या)नवल सोनवणे,प्रकाश वाणी यांच्या हस्ते भेट देवून कार्यान्वीत करण्यात आले आहे. कुटीर रुग्णालय मध्ये येणार्या प्रत्येकाचे या (चेंबरमुळे)टनेल ने सॅनिटायझेशन होणार आहे. व तो निर्जंतुक होईल. तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी ह्या सॅनिटायझर मुळे सादर व्यक्ती हा दोन ते तीन तासांसाठीच निर्जंतुक राहू शकेल. तरी जनतेने या टनेल चा वापर केला नंतरही दर तीन ते चार तासांनी हाथ धुवावे आहे आवाहन केले आहे. पारोळ्याचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व नगरसेवक कैलास चौधरी भैय्या चौधरी यांनी प्रवीण चौधरी यांच्याकडून सॅनिटायझेशन विषयी संपूर्ण माहिती घेतली. पोलीस निरीक्षक यांनी प्रवीण चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केलं. तसेच परोळ्याच्या जनते कडूनही कौतुक करण्यात आले. यासाठी प्रवीण चौधरी, राकेश पाटील, कमलेश चौधरी, मुक्तार पेंटर व आण्णा मिस्तरी यांनी अथक परिश्रम घेतले.






