?️अमळनेर कट्टा…आर आर(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तालुक्यातील सुंदर ग्रामपंचायतीमध्ये दहिवद गावाचा समावेश…
अमळनेर : ग्रामपंचायतीच्या विकास कामातुन गावाचा चेहरा बदलने हेच ध्येय मनात बाळगून जिद्दीने कार्य करणाऱ्या लोकनियुक्त सरपंच सुषमाताई वासुदेव पाटील यांचे अथक व नियोजनपूर्वक कामकाज व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्राम विकास अधिकारी सैंदाणे भाऊसाहेब दहिवद गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने व सहकार्याने दहीवद गावाला तालुक्यातून सुंदर गाव म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे . अमळनेर तालुक्याचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ सर यांनीही सरपंच सौ सुषमा ताई पाटील यांचे अभिनंदन केले..गावकरी व असंख्य जागरूक नागरिकांनी सौ पाटील यांचे व त्यांचे सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.






