Ratnagiri

आदिवासी विशेष भरतीसाठी शासनास निवेदन पाठविण्याचे बिरसा क्रांती दलाकडून आवाहन

आदिवासी विशेष भरतीसाठी शासनास निवेदन पाठविण्याचे बिरसा क्रांती दलाकडून आवाहन

रत्नागिरी : अनुसूचित जमातीची विशेष पदभरती करण्यात यावी, यासाठी प्रत्येक आदिवासी बांधवांनी शासनास निवेदन पाठवावे म्हणून बिरसा क्रांती दल संघटनेने नुकतेच आदिवासी समाजबांधवांना जाहीर आवाहन केले आहे.
आवाहन करताना म्हटले आहे की,
समस्त आदिवासी समाजबांधवांनो,
समाजासाठी तुमच्याकडे दोन दिवसात फक्त 2 मिनिटे वेळ आहे का?नोकरीवाला मुलगा (नवरा) पाहिजे !नोकरीवाली मुलगी (नवरी) पाहिजे!असा आग्रह करणारे बरेच कुटुंब आपणास दिसतात, पण आपल्या समाजातील मुला मुलींना नोकरी मिळावी म्हणून वेळ देऊन लढणारी मंडळी बोटावर मोजता येतील एवढी कमीच आहेत .
या विशेष पदभरतीचा फायदा बेरोजगार, सुशिक्षित आदिवासी युवक , युवतींना होणार आहे. बिरसा क्रांती दल सह सर्वच सहयोगी आदिवासी संघटना एकत्र येऊन नोकरभरतीसाठी काम करत आहेत.
आम्हाला आदिवासी उमेदवारांची नोकरभरती हवी आहे. आदिवासी तरूणांना शासकीय नोकरीसाठी विशेष भरती मोहिम सुरू करण्यासाठी सर्व सहयोगी संघटना एकोप्याने काम करत आहेत हे ब-याच तरूणांना माहित पण नसतील, त्यासाठी हे दोन शब्द.
सद्यस्थितीत समाजातील गरीब बांधवांच्या घरावर आजही कौलं आहेत , घरावरची कौलं बदलली नाहीत. एवढ्या भीषण परिस्थितीत समाज जीवन जगत आहे. त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. याकरिता चांगले जीवन जगण्यासाठी नोकरीची गरज आहे. त्यांच्या जीवनात दोन पैसे आले पाहिजे, ते सुधारले पाहिजे .त्यांचाकडे गाडी बंगला आला पाहिजे.असे वाटत असेल तर दिनांक *20 व 21 फेब्रुवारी* या 2 दिवसांत आपले फक्त 2 मिनिटे समाजासाठी द्याच .
आदिवासी उमेदवारांची विशेष पदभरती करा. याबाबत बिरसा क्रांती दल अभ्यासपूर्ण निवेदन तयार करून सर्वत्र जाहीर करणार आहे. सर्व आदिवासी वाॅटसप ग्रूपवर टाईप केलेले निवेदन सोडणार आहे. हे निवेदन सर्वांसाठीच असणार आहे.
विशेष पदभरती साठीचे निवेदनावर खाली तुमचे स्वतःचे नाव लिहून राज्यातील सर्व बेरोजगार युवक,युवतींनी तसेच पालकांनी दि. २० व २१ फेब्रुवारीला तुमच्या वैयक्तिक ईमेल वरून/ मोबाईल वरून मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.आदिवासी विकास मंञी,मा.मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (सेवा) यांना फक्त इमेल करायचे आहे.
या कामासाठी तुम्हाला फक्त 2 मिनिटे वेळ लागणार आहे. या जन आंदोलनात आपणही शामिल व्हा. दि. २२ ते २६ फेब्रुवारी पर्यंत सर्व संघटना शासनास तालुका व जिल्हा पातळीवरुन निवेदन पाठविणार आहे.
मी तर तयार आहे,तुम्ही तयार आहात का?आमच्या राखीव जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजे.
आरक्षण आमच्या हक्काचे! नाही कुणाच्या बापाचे!
जय बिरसा! जय आदिवासी!
असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी, महासचिव प्रमोद घोडाम, डी.बी.अंबुरे उपाध्यक्ष, सदानंद गावीत उपाध्यक्ष, सुशिलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख,मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख ,दिलीप आंबवणे पुणे विभाग प्रमुख, राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष सांगली तसेच बिरसा क्रांती दलाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी आदिवासी समाजबांधवाना केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button