Amalner

अमळनेर शहरातील 100 गरीब कुटुंबाना किराणा मालाचे वाटप…. -युवकमित्र परिवाराचा उपक्रम….-

अमळनेर शहरातील 100 गरीब कुटुंबाना किराणा मालाचे वाटप….
-युवकमित्र परिवाराचा उपक्रम….-

प्रा जयश्री दाभाडे

-कोरोना रोगाच्या महामारीमुळे रोजगार बुडालेल्या अमळनेर शहरातील झोपडपट्टी भागातील तब्बल 100 कुटुंबांना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले.युवकमित्र परिवार या संस्थेमार्फत आर.के.नगर भागातील झोपडपट्टी, धुळे रोड,विद्युत बोर्ड क्वार्टरमागील झोपडपट्टी भाग,गलवाडे रोड अशा विविध भागात शंभर गरीब कुटुंबाना किमान 15 ते 20 दिवस पुरेल एव्हढे किराणा माल साहित्य वाटप करण्यात आले.

अमळनेर शहरातील 100 गरीब कुटुंबाना किराणा मालाचे वाटप.... -युवकमित्र परिवाराचा उपक्रम....-युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, आर.के.नगरमधील युवक मित्रमंडळाचे शुभम प्रदीप पाटील,पंकज पवार,सबगव्हानचे सरपंच नरेंद्र पाटील,जयेश पाटील,गोपाल शर्मा,रमेश कदम भूषण पाटील,सागर पाटील या युवकांनी एकत्र येत गरीब व गरजू कुटुंबाच्या झोपड्या शोधून त्यांना खाद्यतेल,तूरडाळ,चणाडाळ,मटकी,बिस्किटे,कोलगेट,साबण असे जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.यावेळी रोजगार बुडालेल्या कुटुंबावर समाधान दिसुन येत होते.

कोरोना महामारीमुळे तब्बल महिनाभर संपूर्ण भारत देश बंद आहे.त्यामुळे मोलमजुरी करण्याऱ्या कुटुंबाचा रोजगार बुडालेला आहे.अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने किमान 20 दिवस पुरेल एव्हढा किराणा माल वाटप केले असल्याचे युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी सांगितले.यावेळी शुभम पाटील यांच्यासह युवकमित्र परिवाराचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button