Ratnagiri

सुशिलकुमार पावरा यांचे 124 वे उपोषण

सुशिलकुमार पावरा यांचे 124 वे उपोषण

दिलीप आंबवणे रत्नागिरी

रत्नागिरी : शिक्षक सुशीलकुमार पावरा यांचे पंचायत समिती दापोली येथे 124 वे उपोषण सुरू आहे.दोषी,भ्रष्टाचारी, षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्र धारी,वादग्रस्त विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व नंदलाल कचरू शिंदे बोगस डिग्रीधारक शिक्षण विस्तार अधिकारी खेड यांना सेवेतून बडतर्फ करा,तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी रत्नागिरी एकनाथ आंबोकर यांच्या वरही कडक कारवाई करा,माझी 2 मूळ कागदपञे 2 लाख दंडाच्या रक्कम सह परत करा इत्यादी मागण्यांसाठी शिक्षक सुशीलकुमार पावरा यांनी हे उपोषण पुन्हा छेडले आहे.
उपोषणाचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना देऊन पोहच घेण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना 10000 हून अधिक पञे व स्मरणपञे इतका प्रचंड पञव्यवहार करूनही न्याय मिळत नाही, जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासन दोषी अधिकार्यांना वाचविण्यासाठी आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते,असे सुशीलकुमार पावरा यांचे म्हणणे आहे. सुशीलकुमार पावरा प्रकरणात जिल्हा परिषद रत्नागिरी ला 2 लाख दंड झालेला आहे. त्या दंडाची 2 लाख रक्कम व 2 मूळ कागदपञे अद्याप ही जिल्हा परिषद रत्नागिरी ने दिलेली नाही व दोषी विजय बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली , बोगस नंदलाल शिंदे बोगस शिक्षण विस्तार अधिकारी खेड व दोषारोपीत शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या वर कारवाई केलेली नाही, म्हणून आपल्याला नाईलाजाने सतत उपोषण करावे लागत आहे,असे सुशीलकुमार पावरा यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत आपल्या मागण्यां मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सुशीलकुमार पावरा उपोषणकर्ता यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button