आमदार चिमणराव पाटील यांची व्हिडिओ कॉन्फरन्स
प्रतिनिधी :विक्की खोकरे
एरंडोल-कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांची प्रभावशाली व काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासंदर्भात एरंडोल पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणरावजी पाटील यांनी मतदारसंघातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी
व्हिडिओ_कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली व सर्व यंत्रणेला काटेकोर अंमलबजावणी बाबत सूचना करत तालुक्यातील कोरोनाव्हायरस च्या संदर्भात उपाय योजना बाबत आढावा घेतला..
या बैठकीत पारोळ्याचे तहसीलदार- श्री गवांदे साहेब, मुख्यधिकारी श्री.मुंडे श्री.डाॕ.योगेश साळुंखे, वैद्यकीय अधिकारी, कुटीर रूग्णालय, पारोळा, सौ.प्रांजली पाटील, तालुका आरोग्य आधिकारी, पारोळा, श्री पाटील साहेब, उपअभियंता, पारोळा, सौ.खुर्चे मॕडम, गटविकास आधिकारी, पारोळा, श्री.बागुल साहेब सह पोलीस निरीक्षक, पारोळा, श्री.सुनिल आप्पा पाटील, विस्तार अधिकारी,
एरंडोलचे उपविभागीय अधिकारी – श्री.विनय गोसावी ,तहसीलदार सौ.अर्चना खेतमाळीस , मुख्यधिकारी श्री.किरण देशमुख श्विस्तार अधिकारी, सफकाळे , श्री. संजय ढमाळ ,श्री.डाॕ.भट साहेब, करोना नोडल आॕफिसर, श्री.पाटील साहेब, वैद्यकीय अधिकारी,ग्रामीण रूग्णालय, एरंडोल आदींनी संवाद साधत सविस्तर माहिती दिली






