Amalner

अमळनेर नगरपरिषदेचे आर ओ पाण्याचे केंद्र बंद….लाखो रु खर्च करून जलतृप्ती योजनेचा वाजला बोजवारा…बडा घर पोकळ वासा..

अमळनेर नगरपरिषदेचे आर ओ पाण्याचे केंद्र बंद….लाखो रु खर्च करून जलतृप्ती योजनेचा वाजला बोजवारा…बडा घर पोकळ वासा..

अमळनेर नगरपरिषदेचे आर ओ पाण्याचे केंद्र बंद....लाखो रु खर्च करून जलतृप्ती योजनेचा वाजला बोजवारा...बडा घर पोकळ वासा..

अमळनेर
येथील नगरपरिषदेने शहरात ठीक ठिकाणी जलकेंद्र नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करून उभे केले होते. अमळनेर शहराला पाणी टंचाईचा शाप गेल्या अनेक वर्षांपासून आहे.नागरिक शांत पणे कर भरून पाच दिवसाआड, दहा दिवसाआड येणाऱ्या पाण्याची वाट पाहत असतात.खरच अमळनेर जनता शांत सुसंस्कृत आणि संधी देणारी आहे.परंतु याच सहनशीलतेचा अंत नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी लोकप्रतिनिधी पाहतात.

लोकांच्या सुविधे साठी उभे केलेले जलकेंद्र विविध कारणांमुळे बंद आहेत.सुभाष चौक,पंचायत समिती आवार, बस स्थानक,कोंबडी बाजार इ ठिकाणी जलतृप्ती योजने अंतर्गत जीवनधारा वॉटर ए टी एम मशीन मोठ्या जोशात सुरू आले होते. हे सर्व मशीन अनेक दिवसांपासून बंद आहेत.आणि नागरिकांची निराशा झाली आहे. लाखो रुपये खर्च करून सदर योजना शहरातील पाणी टंचाई वर उपाय म्हणून सुरू करण्यात आली होती.शहरात देखील काही भागात गाडी द्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात होते. परंतु मोठा घर आणि पोकळ वासा असा विषय या योजने संदर्भात झाला.खूप जाहिरात बाजी करून लोकांना आशा दाखवून ही जलकेंद्रे आज बंद आहेत आणि जनतेची निराशा झाली आहे.

जनता आता या योजनेवर झालेला खर्च आणि तिचा उपयोग याच्या चौकशी ची मागणी करत आहे.
पुरस्कार प्राप्त मुख्याधिकारी यांची कोणतीच पुरस्कार प्राप्त योजना अमळनेर तालुक्यात यशस्वी होत नाही?या मागील शंका ही नागरिकांच्या मनात आणि बोलण्यातून व्यक्त होत आहे.

आता ही जल केंद्रे केंव्हा सुरू होतील आणि ती सुरू करण्यासाठी गेल्या आठ ते दहा महिन्यात काय प्रयत्न करण्यात आले याची ही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. लवकरच या विषयावर अमळनेर नगरपरिषदेने खुलासा कारवा अशी मागणी केली जात आहे. अन्यथा नागरिकांच्या हक्काच्या योजना बंद कश्या पडतात याचा जाब नागरिक स्वतःच विचारणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button