? अमळनेर येथे केंद्रीय पथकाने दिली भेट..प्रशासनाच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल…
अमळनेर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुवातीला कमी असला तरी लॉक डावूनच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आणि अमळनेर रेड झोन म्हणून संपूर्ण जळगांव जिल्ह्यात हॉट स्पॉट ठरला.सद्य स्थित तही शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. जळगांव जिल्ह्यात अमळनेर 3 ऱ्या क्रमांक कावर असून रुग्णांची संख्या 271 एव्हढी आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने सोमवारी अमळनेरला भेट देऊन पाहणीकेली.या पाहणीत त्यांना अनेक गोष्टी जाणवल्या असून काँटेन्मेंट झोन मध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली.शिव कॉलनी येथील रहिवासी भाजपचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी काँटेन्मेंट झोन मधील रहिवाशांना पुरेश्या सुविधा प्राप्त होत नसल्याची तक्रार समिती कडे केली.तसेच बॅरिगेट्स बॅनर समिती येणार म्हणून लावले अशी तक्रार त्यांनी समिती कडे केली आहे.
कॉन्टेनमेंट झोन ची पाहणी केल्यानन्तर केंद्रीय पथकाने सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची आढावा बैठक प्रताप महाविद्यालय येथे घेतली.या बैठकीत आता पर्यंत विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत केंद्रीय समितीने स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यात एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या मागे किमान सहा स्वॅब घेणे आवश्यक आहे. रुग्ण संख्या वाढली तरी घाबरू नका. कोरोना सर्व जगात पसरला आहे. रुग्ण किंवा बाधित पेशंट पेक्षा सायलेंट कॅरियर गावात
फिरत असतात. जितक्या चाचण्या अधिक घेतल्या जातील तितके लवकर नियंत्रण मिळवू, अशा सूचना/ आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी ठोस प्रहारच्या संपादिका प्रा जयश्री दाभाडे यांनी देखील नियोजन शून्य प्रशासन, मनमानी कारभार, जनता,प्रशासन,लोक प्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यातील दुरावा आणि कॅमुनिकेशन गॅप,वशिलेबाजी, गगरीब जनतेला प्रशासन वेठीस धरते अश्या अनेक तक्रारी वजा सूचना केंद्रीय समिती आणि मा जिल्हाधिकारी यांना केल्या.
केंद्रीय समितीत आरोग्य मंत्रालयाचे अप्पर वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. अरविंद अलोने , ऍडव्हायजर डॉ. सुनील खापर्डे
यांच्यासह नुकतेच पदभार स्विकारलेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत
अमळनेर तालुक्याच्या भरारी पथकात समाविष्ठ होते.याशिवाय सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते






