?️अमळनेर कट्टा..आधा सो गया ये जहाँ सो गया आसमान..!शहरात कडकडीत बंद…!दुकाने बंद पण रस्ते बंद झाले नाहीत..!
अमळनेर येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरात 3 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज लॉक डाऊन पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दुकाने,बाजारपेठा बंद होते.नेहमी प्रमाणे काही दुकाने ही पुढून बंद तर मागून सुरू होती.प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनाही ही दुकाने माहीत आहेत.परंतु त्यांच्याच आशीर्वादाने ती सुरू राहत असल्याने त्यावर काही उपाय होणे शक्य नाही.दारू लिकर आणि बिअर बार मागून सुरू होते.. असो..! हॉटेल्स आणि नाश्ता केंद्र नेहमी प्रमाणे काही ठिकाणी सुरू होते.पार्सल सेवा कुठेही आढळून आली नाही.
काही व्यापारी,दुकानदार हे जावई आहेत प्रशासनाचे त्यामुळे त्यांना स्वतंत्र सूट असतेच हा संपूर्ण कोरोना वर्षातील अनुभव आहे.
पण रस्ते मात्र तुफान सुरू होते.लोक कोणत्या न कोणत्या कारणांसाठी बाहेर पडत होते. रस्त्यांवर गर्दी होती. वाहनांची बऱ्या पैकी अवाक जावक सुरू होती.ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता…!पण फक्त तैनात होता..!
ठिक ठिकाणी लोक घोळका करून उभे होते. एकूणच लॉक डाऊन म्हणजे फक्त दुकाने बाजारपेठ बंद असाच अर्थ अमळनेर करांनी घेतला असून बाकी सर्व ऑल बेल सुरू होत.दवाखान्यांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती.सोशल डिस्टनगसिंग वै हा प्रकार आढळून आला नाही.चौका चौकात गप्पा रंगल्या होत्या.एटीएम,बँक,औषध दुकाने येथे गर्दी होतीच..!पहिला दिवस तर असा संमिश्र पार पडला आहे उद्या पाहू यात काय होतं ते..!







