Amalner

अमळनेर शहराची शान आणि प्राचीन वास्तू दगडी दरवाजाची पडझड…पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष…

अमळनेर शहराची शान आणि प्राचीन वास्तू दगडी दरवाजाची पडझड…पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष…

योगेश पवार

अमळनेर शहरातील मध्यवर्ती भागात
पुरात्व विभाग अंतर्गत राज्यसंरक्षित स्मारक वेस (दगडी दरवाजा) आहे.सदर वेस शहरातून जाणारारा.मा.१५ वरच आहे ह्या वास्तुशी आमची अमळनेरकरांची अस्मिता जोडली आहे. आपल्या
पूर्वजांचा इतिहासाचे स्मरण आम्हास हि वास्तू करुन देते. वेस (दगडी दरवाजा) अतिशय जिर्ण झाला आहे. त्याची सदा पडझड होत असते. त्या अनुशंगाने संबंधित विभागास वारंवार तक्रार करुन देखील दुर्लक्षित केले जाते.

त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असते.
दि.२४/०७/२०१९ रोजी ह्या वेस चा उजवा बुरुज कोसळला असून देखील आज पावेतो
कुठली दुरुस्ती विभागाने केलेली नाही. तरी सदर वेस (दगडी दरवाजा) पुरातत्व विभागच्या संरक्षित स्मारक मधून वगळून अमळनेर नगरपरिषद, अमळनेर जि.जळगांव कडे वर्ग करण्यात यावा जेणेकरुन त्याची देखभाल दुरुस्ती, पुननिर्मीती, संगोपन योग्य रीतीने होऊ शकते.

तरी महोदय राज्यसंरक्षित स्मारक, पुरातत्व विभाग यांना आपल्या स्तरावरुन आदेशित करुन
वेस (दगडी दरवाजा) अमळनेर नगरपरिषद, अमळनेर जि.जळगांव कडे हस्तांतरित करण्यात यावा.असे निवेदन मा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले आहे.या निवेदनाची माहीतीस्तव प्रत
मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब,मंत्री, पर्यटन विभाग , मंत्रालय, मुंबई
मा.जिल्हाधिकारी सो,यांना रवाना करण्यात आली आहे.

कृपा करून परिस्थिती चे गांभीर्य पाहून भविष्यातील होणारा अनर्थ टाळण्यासाठी पूर्ण दरवाजाचा उतरवून घ्यावा दरवाज्याला मधल्या भागात देखील मोठे तडे गेले ले आहेत तरी तात्काळ सदर दरवाजा अतिशय घातक झाला आहे मागील काळात नागरपालिकेकडे वर्ग करावा अशी मागणी देखील आम्ही केलेली आहे कारण या बाबतीत पुरातत्व विभाग अतिशय उदासीन आहे

आपला
पंकज पंडीत चौधरी
मा सदस्य जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button