Erandol

एरंडोल येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन.‌‍..

एरंडोल येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन.‌‍..

रजनीकांत पाटील

एरंडोल:-येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात तालुक्यातील अपंग (दिव्यांग) व्यक्तीचे नाव राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम योजनेत व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना नाव समाविष्ट करून त्या योजनेचा शासन नियमाप्रमाणे लाभ मिळावा या मागणीसाठी आज एरंडोल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार ए.पी.शिरसाट यांना निवेदन देण्यात आले,
निवेदन देतेवेळी प्रहार अपंग दिव्यांग क्रांती संघटनेचे एरंडोल शहर अध्यक्ष रमेश चौधरी, प्रदीप फराटे, सोनू वाणी, निर्मला चौधरी, उदय पाटील, गुरुदास पाटील, प्रमोद चौधरी, व शहरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button