Maharashtra

युवा मराठी चॅनलवर झळकणार लातूर चा बालाजी सूळ

झी युवा मराठी चॅनलवर झळकणार लातूर चा बालाजी सूळ

प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे
एक टप्पा आऊट या स्टार प्रवाह चॅनल वरील विनोदी शोच्या यशानंतर लातूरचा विनोदवीर बालाजी सुळ आता झी युवा वरील “लाव रे तो व्हिडीओ’ या शोमध्ये झळकणार आहे.हा कार्यक्रम झी मराठी वरील चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध कलावंत निलेश साबळे यांनी निर्मिती व दिग्दर्शित केलेला आहे.
बालाजी सुळ याने लातूरच्या विविध व्यासपीठावरूनआपल्या कलाप्रदर्शनाचा श्रीगणेशा केला व पुढे स्टार प्रवाह वरील एक टप्पा आऊट मधील लातूर ची भाषा विनोदी शैली च्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र समोर आणणारा कलावंत म्हणून आज बालाजीची सर्वत्र ओळख आहे…
विनोदी सादरीकरणा बरोबरच निवेदन,अभिनय,नृत्य,लोककला सादरीकरण अशा विविध भूमिकांतून त्याने आत्तापर्यंत अनेकांचे मनोरंजन केले…. लॉक डाऊन च्या काळात “घरी बसुया आणि थोडं हसूया” या फेसबुक लाईव्ह द्वारे हास्य विनोदाच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती मोहीम राबविली होती…
एवढ्यावरच बालाजीचा प्रवास थांबला नाही तर आता ‘लाव रे तो व्हिडिओ’ या शोमध्ये आपल्या लातूरच्या रत्नाने झेप घेतली आहे व
लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्यासाठी येणार आहे.
हा कार्यक्रम बुधवारि आणि गुरूवार रात्री 9:30 ते 10:30 या वेळेत प्रेक्षपित होणार आहे.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button