चाकाटी येथील महादेव मंदिर सभामंडपाचे कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
पुणे : इंदापुर तालुक्यातील चाकाटी येथील महादेव मंदिर येथे पुणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या जिल्हा परिषद स्थानिक विकास निधीतून उभारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न केले. धार्मिक कार्यक्रमासाठी सभामंडप असावे या दृष्टिकोनातून हा सभामंडप मंजूर केले होते. यासाठी अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी पाच लक्ष रुपये मंजूर केले होते.
या कार्यक्रमासाठी बापूराव बंडगर, रामचंद्र पाटील, मोहन मारकड, नारायण घोडके, कैलास मारकड, विकी मारकड, नाना घोडके, शामराव तनपुरे, महादेव फडतरे, सोपान मारकड, उमाजी जाधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.






