संचारबंदीचा फायदा घेत आहे. ग्रामीण भागातील किराणा दुकानदार
पट्रोल व गुटख्याची काळ्या बाजारात सर्रास विक्री रजनीकांत पाटीलअमळनेर : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारकडून विविध पऊली उचलली जात आहे. सर्व जिवन आवश्यक वस्तूंची दुकाने किराणा दुकान,औषधी दुकान 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे.
मात्र ग्रामीण भागातील काही किरकोळ किराणा दुकानांवर या संचारबंदी चा दुरुपयोग करत वेगळाच फायदा घेतांना दिसत आहे .किराणा दुकान चा उपयोग जीवनावश्यक वस्तूसाठी दिला आहे.
या बाबत पेट्रोल व गुटखा विक्री सर्रास जोमाने चालू आहे. खेड्यातील काही दुकानदार पेट्रोल चा दोनशे ते कोणी पाचशे लिटरचा साठा केला आहे. व ते गावात लोकांना जादा दराने शंभर रुपये ते पण एक लिटर ला कमी असल्याचे चर्चा आहे. या बाबत सर्व लूट करत दुकानदार जादा नफा मिळवत आहे. तसेच गुटखा बंदी असली तरी दुकानदार छुप्या पद्धतीने गुटखा ची विक्री सर्रास पने आहे. किराणा दुकानदार गुटखा विमल पंधरा रुपये ते तीस रुपये ने देऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकतांना दिसत आहे.अशा या संचारबंदी चा फायदा घेणाऱ्या दुकानदारांन वर कारवाई करावी या बाबत गावातील नागरिकांनकडून बोलले जात आहे.






