Amalner

?️अमळनेर कट्टा..एकाला सील तर दुसऱ्याला ढील..!एक हजार रु रोज दिले जातायेत..दुर्लक्ष करण्यासाठी..!

?️अमळनेर कट्टा..एकाला सील तर दुसऱ्याला ढील..!एक हजार रु रोज दिले जातायेत..दुर्लक्ष करण्यासाठी..!मुद्रांक कार्यालय सील..!तर इतरांवर दंडात्मक कार्यवाही…

अमळनेर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.अत्यंत गंभीर परिस्थिती असताना नागरिक मात्र नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी पोलिस प्रशासन आणि पालिका ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. या अनुषंगाने विविध ठिकाणी दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. यात 3 लग्नकार्याच्या यजमानांना दंड करून मुद्रांक विक्रेते कार्यालय ३० एप्रिलपर्यंत सील केले आहे.

२२ एप्रिल रोजी नियमांचे उल्लंघन केल्या बद्दल 3 मंगल कार्यालय आणि मुद्रांक कार्यालयावर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, प्रमोद पाटील, बी.एन. साळुंखे, पालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल, यश लोहरे, सुरेश चव्हाण, जयदीप गजरे, विशाल सपकाळे, अविनाश बिऱ्हाडे, जगदीश बिऱ्हाडे यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या लग्न ठिकाणी पाहणी केली असता तीन ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमली असल्याचे आढळून आले.

त्यामुळे कल्पनाबाई साखरलाल महाजन, शैलेश निंबा अमृतकार, भिकन नामदेव पाटील या तीन वेगवेगळ्या आयोजक व यजमानांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

मुद्रांक कार्यालय 30 पर्यंत बंद..

तहसील कार्यालयामागील मुद्रांक विक्रेते कार्यालयात खरेदी-विक्री नोंदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचे आदेश दिल्यानुसार ते कार्यालय कुलूप सील करण्यात आले. पुन:पुन्हा हे प्रकार होऊ नयेत म्हणून मुद्रांक विक्रेत्यांनीदेखील संमती दिल्याने ३० एप्रिलपर्यंत या कार्यालयाला कुलूप राहणार आहे.

तर आज 23 एप्रिल रोजी देखील विविध ठिकाणी कार्यवाही करून दंड आकारण्यात आला आहे. यात रामा होजियरी 2000 रु दंड,ए टू झेड ट्रेडर्स 2000रु दंड,दिनेश लुल्ला 2000 रु दंड,गोविंदराव आहुजा 2000 रु दंड,हरीश लुल्ला 2000 रु दंड,रघुनाथ कासार 1000 रु दंड,राम श्याम नास्ता सेंटर 500 रु दंड,न्यू हुसेनी शॉप 500 रु दंड,मनोज भाई 200 रु दंड,महावीर एमपोरीयम 5000 रु दंड,हिम्मत महाजन 200 रु दंड, असे कोव्हिड 19 चे उल्लंघन व मास्क न लावल्या बद्दल दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान अनेक ठिकाणी चोरून तर काही ठिकाणी उघड पणे दुकाने सुरू होती.अश्या दुकानाची माहिती देऊन ही कोणतीही कार्यवाही प्रशासनाने केली नाही.फोटो व्हिडीओ पाठवले असून एका व्हिडीओ त स्वतः न प चे कर्मचारी व्हिडीओ घेत आहेत पण कोणतीही कार्यवाही केली नाही.दररोज एक हजार रुपये हप्ता ठरला असल्याची खात्री लायक माहिती ठोस प्रहार च्या हाती आली आहे.

?️अमळनेर कट्टा..एकाला सील तर दुसऱ्याला ढील..!एक हजार रु रोज दिले जातायेत..दुर्लक्ष करण्यासाठी..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button