Chalisgaon

माधवगिरी महाराजांच्या मंदिराचा विकासासाठी पन्नास लाखांचा प्रस्ताव –खासदार उन्मेश दादा पाटील यांची माहिती

माधवगिरी महाराजांच्या मंदिराचा विकासासाठी पन्नास लाखांचा प्रस्ताव
–खासदार उन्मेश दादा पाटील यांची माहिती

खासदार उन्मेश दादांच्या तत्कालीन आमदार निधीतील मंजूर ग्रामपंचायत कार्यालयाचे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन

रांजणगावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : रस्ते काँक्रीटीकरण कामासाठी पाच लाखांचा निधीची घोषणा
पर्यटन क्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सातशे वर्षांपूर्वीच्या जिवंत समाधी असलेल्या श्री संत माधवगिरी महाराज मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण व भाविकांच्या सोयीसुविधांची होणार व्यवस्था: पन्नास लाखाच्या निधीचा प्रस्ताव

रांजणगाव ता. चाळीसगाव — सातशे वर्षापासून भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत माधवगिरी महाराजांच्या समाधी मंदिर परिसराच्या सुशोभीकरण करण्यासाठी लवकरच पर्यटन स्थळ विकास अंतर्गत पन्नास लाखांचा निधीचा प्रस्ताव तयार केला जाईल.आज ग्रामपंचायत कार्यालयाचा बांधकामाचा शुभारंभ होत असताना गावातील रस्त्यांच्या कामासाठी पाच लाखांचा निधी देतो. यापुढे देखील रांजणगावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतीक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे.
रांजणगाव येथे ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन सोहळा जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. सन 2019 मध्ये तत्कालीन आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने 25/15 निधीतून ग्रामपंचायत इमारत रांजणगाव वासीयांना मिळणार आहे. रांजणगावाच्या गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात गावातील गट ,तट बाजूला ठेऊन पहिल्यांदाच खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या सत्कारासाठी प्रथमच अशा सर्वपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायती मार्फत करण्यात आले होते व कार्यक्रमासाठी गावातील सर्व पक्षीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांचा सत्कार माजी सरपंच जीभाऊ आधार पाटील तसेच गावच्या प्रथम नागरिक सरपंच सोनाली निंबाळकर व शेखर निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले,या कार्यक्रमाप्रसंगी प्रमोद चव्हाण ,प्रदीप सोनवणे ,शेखर निंबाळकर ,भास्करराव चव्हाण,डॉ. महेंद्र राठोड अमजद पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले ….. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला उत्तर देताना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी गावाच्या विकासासाठी एकत्र आल्या बद्दल सर्व गावकऱ्यांचे कौतुक केले व गावाच्या कॉक्रीटी करणा साठी पाच लाख रुपये निधीची घोषणा केली ,या कार्यक्रमासाठी राकेश बोरसे सर,अनिल चव्हाण,सांगवीचे सरपंच डॉ महेंद्र राठोड, रमेश राठोड ,उपसरपंच संतोष सुर्यवंशी, भोला दादा पाटील,अनिल सूर्यवंशी, देविदास मोरे,छोटू नाना पाटील,बापू अहिरे, जमीर शेख अस्लम, भाऊसाहेब चव्हाण ,विनायक चव्हाण,पंढरीनाथ पाटे,एकनाथ अप्पा पाटे, नामदेव परभत पाटील ,सुरेश परदेशी ,बाळासाहेब देवरे,सुरेश बारिकराव चव्हाण, सुनील भाऊसाहेब चव्हाण, भिकन मामा परदेशी, संतोष मामा कोळी,माधवराव पंडितराव चव्हाण,मकरंद नाईक, भिला पाटील,संजय पाटील,दिलीप परदेशी, छोटू सूर्यवंशी, पप्पू सूर्यवंशी, रमेश चव्हाण ,बबलू खैरनार, भोला वाघ,अविनाश कुलकर्णी, हरी वारुळे, धनराज सूर्यवंशी,हिलाल ठाकरे,भालचंद्र सोनवणे ,नंदूसिंग परदेशी यांचे सह गावातील नागरिक उपस्थित होते. सूत्र संचालन शेखर निबालकर यांनी तर आभार ग्रामसेवक जयवंत येवले यांनी मानले,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गणेश देवरे,वाल्मिक सोनवणे,कचरू भाऊ,प्रवीण जाधव यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button