भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची रक्कम त्वरित जमा करावे
इंद्रजीत डुमणे गागलेगावकर
नांदेड प्रतिनिधी – (वैभव घाटे)
सन 2019 -2020 मधील स्वाधार योजनेची गुणवत्ता यादी लागून बराच काळ उलटूनही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम अजुनही जमा करण्यात आलेली नाही. तसेच प्रथम वर्षातील विध्यार्थांचे एक सत्र संपले असतानाही व शैक्षणिक वर्ष संपत आले असतानाही प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या खात्यात स्वाधारचा प्रथम हप्ताही अद्याप जमा करण्यात आलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांवर उपवासमारीची वेळ आलेली आहे.
तर देशातील वाढत्या कोरोना व्हारसच्या संकटामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणानिमित्त शहरी भागात राहायला आलेले त्याचांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. जेमतेम विद्यार्थाचे पालक कामगार, कष्ट्करी, मजुरदार, शेतमजूर, वेठबिगारी असल्यामुळे विध्यार्थाकडिल उदारीवरील आर्थिक पुंजी सुद्धा संपली असल्यामुळे व वाढत्या कोरोना व्हारसच्या संकटाने विध्यार्थी कोरोना व्हारसने नंतर मरेल. पण त्या अगोदर तो भूकमारीने मरेल अशी विद्यार्थाची अवस्था झाली आहे.
तसेच एखादा विद्यार्थी र्थी मूलभूत गरजांच्यासाठी उदारीच्या आर्थिक विवेचंनात मरण पावल्यास त्यासाठी कोण जबाबदार राहणार? याचा गाभीर्याने विचार करून मा. सामाजिक न्याय मंत्री यानी भारत सरकार शिष्यवृती व सन 2019 – 2020 मधील प्रथम वर्षातील विधार्थांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची पूर्ण रक्कम त्वरित विध्यार्थाच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अशी मागणी इंद्रजित डुमने यांनी केली आहे






