Pandharpur

पंढरपूर नगरपरिषद चे वतीने शहरातील सर्व नागरिकांची पल्स ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करणार आमदार प्रशांतराव परिचारक

पंढरपूर नगरपरिषद चे वतीने शहरातील सर्व नागरिकांची पल्स ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करणार आमदार प्रशांतराव परिचारक

रफिक आतार

पंढरपूर नगरपरिषद चे वतीने शहरातील प्रभाग क्र पाच मध्ये नागरिकांचा पल्स ऑक्सीमिटर द्वारे तपासणी करण्याचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांचे अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर प्रभाग क्र 5 चे नगरसेवक व उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव ,नगरसेवक सुप्रिया डांगे,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर , मुख्यवैधकीय अधिकारी डॉ बी के धोत्रे,नाना कवठेकर, डॉ मिलिंद जोशी यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आला यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की,पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांचा पुन्हा एकदा आशा वर्कर व एनम चे मार्फत सर्व्ह करण्यात येणार असून या सर्व्ह मध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा पल्स रेट, शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण ,सारी व कोरोना चे लक्षणे ची तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे निश्चित पणे नागरिकांना याचा फायदा होणार आहे तसेच नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी बोलताना सांगितले की,शहरात आशा वर्कर व एनम नर्स च्या आठ टीम केल्या असून त्यांचा मार्फ़त एक लाख लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे माहिती दिली व आशा प्रकारे नागरिकांची पल्सऑक्सीमिटर द्वारे तपासणी करणारी पंढरपूर नगरपालिका ही भारतातील पहिली नगरपालिका असल्याचे सांगितले यावेळी डॉ राजश्री सालविठ्ठल,डॉ वृषाली पाटील, विशाल जपे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड,नरेंद्र डांगे,श्रीनिवास देहूकर महाराज, मुरलीधर भट्टड,परेश पारसवार,संजय झवेरी,श्याम अन्नदाते ,प्रसाद शास्त्री हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button