Amalner

दहिवद गावात गिरणा चे पाणी पोहचले

दहिवद गावात गिरणा चे पाणी पोहचले

दहिवद गावात गिरणा चे पाणी पोहचले

    अमळनेर तालुक्यात सर्वत्र पाऊस होत असून तालुक्यातील सर्वच नद्या नाले वाहतांना दिसत असल्या तरी दहिवद गावात मात्र नदी नाले कोरडेच होते व दहिवद गावात पाच सहा वर्षांपासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने दहिवद गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील यांनी पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी उपाययोजना म्हणून  दिनांक ६ आँगस्ट २०१९ रोजी कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे जळगाव यांना भीषण पाणीटंचाई निवारणकामी पाटचारी क्र ३ व ८ ला पाणी सोडण्याची विनंती निवेदन दिले होते निवेदन देऊन महिना झाला तरी पाटबंधारे विभागाने पाणी समस्या सोडविण्यासाठी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी लोकनियुक्त सरपंच प्रत्यक्ष आपल्या शिष्ठमंडळासह धरणगाव च्या पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना निवेदन देऊन चर्चा करतांना पाटबंधारे विभागाला सुचित केले की दहिवद गावाला तात्काळ पाणी द्यावे अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ही  लोकनियुक्त सरपंच सह शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाला दिला होता .

दहिवद गावात गिरणा चे पाणी पोहचले
  जळगाव धरणगाव पाटबंधारे विभागाने लोकनियुक्त सरपंच यांच्या निवेदनाची दखल घेत तिसर्‍याच दिवशी दहिवद गावात गिरणा धरणातून सोडलेले पाणी पोहचवले दहिवद शिवारात पाणी पोहचताच दहिवदच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुषमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा प सदस्य सुनिल पाटील, बाळू दादा पाटील,  गुलाब पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाटील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, प्रविणदादा माळी, बबलु माळी, सुनिल माळी,भैया दादा पुजारी, निलेश पवार, प्रविण पाटील, भैया वायरमन, भुरा पाटील, भावडू पाटील, निंबा पाटील सह ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांनी आलेल पाणी नदी नाल्यासह पाणीफाउंडेशन च्या झालेल्या कामापर्यन्त पोहचवण्याच मुख्य कार्य करीत आहेत
  दहिवद गावात गिरणा धरणातून सोडलेले पाणी पोहचल्याने ग्रामस्थांमधे आनंदमय वातावरण निर्माण झाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button