Chimur

ओबीसी साठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज घरकुल योजना सुरु करावी कवडू लोहकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे मागणी

ओबीसी साठी “छत्रपती राजर्षी शाहू महाराज “घरकुल योजना सुरु करावी कवडू लोहकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे मागणी

ज्ञानेश्वर जुमनाके

चिमुर गरीब लोकांना घर मिळावे व त्यांचा हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून प्रधान मंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने आदिवासी लोकांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र सरकार ने अनुसुचित जाती, जमाती साठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली. नुकतच शासनाने धनगर समाजासाठी अहिल्याबाई होळकर घरकुल योजना सुरू करण्यात आली पण ओबीसी साठी कोणत्याच प्रकारची घरकुल योजना शासनाने सुरु केली नाही. महाराष्ट्र राज्यात ओबीसी मध्ये एकुन ३६०जाती असुनही घरकुल योजनेत कोणत्याही प्रकारची तरतुद शासनाने केली नाही.

ओबीसी मध्ये ३६०जाती आहेत. ह्या जातीमध्ये काही जाती अशा आहेत की “”हातावर आणुन, पानावर खाणारे आहेत”.त्यांची परिस्थिती हालाकिची आहे. त्यांचे कुटुंबे उघड्यावर आहेत. स्वत:चा निवारा बांधु शकत नाही. अशा ओबीसी बांधवांना केंद्र शासनाने “छत्रपती राजर्षी शाहू महाराज ” घरकुल योजना सुरू करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधीकारी महासंघाचे कोषाध्यक्ष कवडू लोहकरे यांनी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे करण्यात आली.

१९३१ ला भारतात ओबीसी समाजाची जनगणना झाली पण त्यानंतर ओबीसी ची जनगणना झाली च नाही. २०२१ च्या राष्ट्रीय जनगणेत ओबीसी चा स्वातंत्र्य काँलम नसल्याने समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे. संविधानाच्या कलम ३४० नुसार ओबीसी समाजाला जनगणेचा घटनात्मक अधिकार दिला आहे. पण सरकार ला ओबीसी ची जनगणना च करायची नाही आहे.त्यांचे हक्क व अधिकार ओबीसी ना द्यायचे नाही. ५२ टक्के ओबीसी असतांना १९ टक्के आरक्षण दिले जात आहे. प्रत्येक क्षेत्रात ओबीसी ना त्यांच्या अधिकारांपासुन वंचीत ठेवले जात आहे. ओबीसी समाजात जास्त जातीचा समावेश असुनही घरकुल पासुन वंचीत आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक, सामाजिक, कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळाली. समाजाची उन्नती झाली. अशा थोर महापुरुषांच्या नावाने घरकुल योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे कोषाध्यक्ष कवडू लोहकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडे करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button