भिसी आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे उदघाटन ……….
ज्ञानेश्वर जुमनाके
भिसी येथील छत्रपती शाहू महाराज बहुउद्वेशिय मंडळ च्या वतीने आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे उदघाटन नवनिर्वाचित आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढविणारे संदीप गडमवार वसंत वारजूकर माजी राज्यमंत्री डॉ रमेशकुमार गजभे,पस सदस्य प्रदीप कामडी सरपंच योगिता गोहणे किशोर नेरलावर ,गोपाल बलदवा बंडूभाऊ जावळेकर घनश्याम असावा नगरसेवक सतीश जाधव नितीन गभने सचिन गाडीवार आदी मान्यवर उपस्थित होते .
चिमूर विधानसभा क्षेत्रातुन दुसऱ्यांदा निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की भिसी वासीयांनी मला स्वतः चा मुलगा समजून भरभरून मत दिले त्यामुळे मी विजयी झालो. भिसी ची सेवा करण्याची संधी पुन्हा दिली. जीवनातील प्रत्येक क्षण भिसी साठी करेल . काही बंडखोर खोटे भीती आरोप करीत सुटले कपाटाची चाबी कोठे जाईल असा प्रश्न करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे भिसी ला स्वतंत्र तहसील दर्जा मिळवून देणार असल्याचे सांगत क्रीडासकुल सुद्धा बनवून देण्याचे अभिवचन देतो . पुढच्या वर्षी आमदार चषक ला 15 लाख निधी देण्याची घोषणा करीत खो खो स्पर्धा घेण्याची सुद्धा सूचना केली. चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे करण्याचे आदेश देत शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.






