Satara

पिंप्रद येथील व्यायामासाठी पहाटे गेलेले पती पत्नी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

पिंप्रद येथील व्यायामासाठी पहाटे गेलेले पती पत्नी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

दिलीप वाघमारे

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील किसन मारुती बोराटे वय वर्षे ५१ व छाया किसन बोराटे वय वर्षे ४७ हे पहाटे व्यायामासाठी गेले असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले आहेत.पिंप्रद येथील व्यायामासाठी पहाटे गेलेले पती पत्नी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठारयाबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान पिंप्रद येथील मयत छाया किसन बोराटे वय -४७ व मयत किसन मारूती बोराटे वय-५१ हे दोघे नवरा बायको घरातून सकाळी लवकर उठून व्यायाम करणेसाठी पिंप्रद येथील त्यांच्या राहत्या घरातून बाहेर पडून पिंप्रद गावच्या लगत असलेला फलटण -पंढरपुर महामार्गावर पायी चालण्यासाठी गेले होते. त्यावेळी पिंप्रद गावा लगत असणाऱ्या निंबाळकर वस्ती येथून चालत परत घरी येत असताना गुरूकुल शाळेच्या कमाणी जवळ चालत आले असताना पंढरपुर बाजूकडून एक अज्ञात पिकअप सारख्या वाहनाने पाठीमागून त्या दोघांना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली व ते दोघे रस्त्यावर पडले. सदरचे वाहन न थांबवता निघून गेले त्या नंतर सदर अपघाताची माहिती मिळाताच पिंप्रद गावचे पोलीस पाटील सुनिल बोराटे हे घटना ठिकाणी गेले. त्या दोघाना गावातील लोकांच्या सहाय्याने खाजगी वाहनाने उपचारासाठी फलटण येथील लाईफ लाईन हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या वरती उपचार चालू असताना ते दोघे मयत झाले आहेत.या बोराटे कुंटुबीयांनी पिंप्रद सारख्या ग्रामीण भागात ग्रामीण भागातील मुलांना व्यायामासाठी एक सुसज्ज अशी व्यायाम शाळा उभारली आहे. त्यांच्या अकस्मित अपघाती निधनामुळे पिंप्रद गावावर शोककळा पसरली आहे.
सदर अपघाताची खबर पोलीस पाटील सुनील बोराटे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिली असून याचा तपास फलटण ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सावंत करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button