?️ अमळनेर कट्टा… पाण्याच्या प्रश्नावर उत्तर महाराष्ट्रांने प्रादेशिक अस्मितेवर लढा उभारला पाहिजे असा सूर खान्देश विकास मंडळ संचलित उत्तर महाराष्ट्र जल परिषद आयोजित
अमळनेर : पाण्याच्या प्रश्नावर उत्तर महाराष्ट्रांने प्रादेशिक अस्मितेवर लढा उभारला पाहिजे असा सूर खान्देश विकास मंडळ संचलित
उत्तर महाराष्ट्र जल परिषद आयोजित
आभासी जल यात्रे सहभागी जळगांव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंनी , जळतज्ञ,जनआंदोलन कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.जलयात्रेत YouTube व Facebook द्वारे ऑनलाईन लोकांनी उपस्थिती दिली.
१४ मे रोजी उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नांवर व्यापक मंथन होत असलेल्या जलयात्रेचे उदघाटन आ.अनिल पाटील यांनी केले.पाडळसे धरण पूर्ण करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून मोठ्या निधीसाठी सातत्याने प्रयत्न करीत असून खासदारांनीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून केंद्रीय निधी साठी सर्वपक्षीय योगदानाची गरज असल्याचे प्रतिपादन उदघाटकीय भाषणात केले.
अध्यक्षीय भाषणात खा.उन्मेश पाटील यांनी केंद्राकडून पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत निम्न तापी प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी पुर्ण करून समावेशासाठी प्रयत्न करीत आहोत!जनआंदोलन समितीच्या रेट्यामुळे निर्माण होणाऱ्या दबवातून प्रश्न सुटण्यास मदत होत आहे.उत्तर महाराष्ट्र जल परिषदेच्या प्रयत्नांचे कौतुक यावेळी खा.उन्मेष पाटील यांनी केले.
यावेळी प्रास्ताविकात जळगांव जिल्हा जलविकास परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तापी खोरे प्रकल्पांचा आढावा देत तापी नदी महाराष्ट्रात २२८ कि.मि वाहत असून निम्न तापी प्रकल्प सह महाकाय भूजल पुनर्भरण योजना कार्यन्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी सहभागी प्रमुख वक्ते पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी सांगितले कि, लोकप्रतिनिधी व राजकीय अनास्थेमुळे निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचे नुकसान झालेले आहे. यावेळी प्रथमच एकरकमी १३५ कोटी निधी मिळाला असला तरी समिती समाधानी नाही! धरण पूर्ण होण्यासाठी मोठा निधी मिळावा म्हणून आम्ही जनआंदोलनाच्या तयारीत आहोत.
पाडळसे जनआंदोलन समितीचे प्रसिद्धी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी,”पाणी प्रश्नावर उत्तर महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता निर्माण होणे काळाची गरज आहे. यापुढे जलसमृद्धीचा लढा स्थानिक आंदोलनापूरता मर्यादित न ठेवता उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक पातळीवर एकत्रितपणे उभा राहणे आवश्यक आहे.उत्तर महाराष्ट्राच्या वाटेचे असलेले स्थानिक शेतकऱ्यांना हक्कांचे गुजरातला वाहून जाणारे पाणी पाडळसे धरणासारखे मोठे प्रकल्प तातडीने पूर्ण करून अडवावे व संजीवनी हि समितीची भूमिका आहे.असे सांगितले.
“दुर्दैवाने महाराष्ट्राला उत्तर महाराष्ट्रातील एकही मुख्यमंत्री झाला नाही.प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी चोरले गेले यास लोकप्रतिनिधिंइतकेच लोकही जबाबदार आहेत.जलसमृध्द उत्तर महाराष्ट्रासाठी मोठा जनसहभाग आवश्यक आहे”.असे मनोगत जलपरिषदेचे आयोजक
विकास पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले. दिल्ली येथिल जलतज्ञ रंगराव पाटील यांनी पांझरा माळण प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.तर जल परिषदेचे कार्यवाह भिला पाटिल यांनी गिरणा बलून बंधारे बाबत चर्चा केली.जलपरिषदेचे कार्यकर्ते अर्जुन पाटिल यांनी खान्देशात जलसंधारण, जलसमृद्धी व कृषिसिंचनासाठी पाण्याची आवश्यकतेचे विवेचन केले. परिषदेचे उपाध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी सांगितले की खान्देशात आज प्रत्येक घरी आखाजी निमित्त घागरेत पाणी भरून पुजले गेले असतानाच जलसमृद्धीसाठी सुरू झालेल्या लढ्याचे स्वागत केले.
उत्तर महाराष्ट्रातील जलस्त्रोत, जलसाठे,नदी,नाले,ओढे एकमेकांशी नदीजोड प्रकल्पांतर्गत जोडण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणे. जलक्रांतीतून जलसमृद्धी आणि जलसमृध्दीतून जरसिंचन आणि जलसिंचनातून उत्तर महाराष्ट्र सुजलाम,सुफलाम करणे.ही उध्दिष्टे साध्य करणेसाठी लोकजागृती, लोक चळवळ उभी करणेसाठी उत्तर महाराष्ट्र जल परीषदेने दि:१४ ते १७ मे,२०२१ रोजी दररोज संध्याकाळी ५ ते ६.३० यावेळेत ऑनलाईन व्हर्च्युअल वॉटर रँली आयोजित केलेली आहे.सदर परिषदेत तापी खोरे,तापी नदीवरील पाडळसरे धरण (निम्न तापी प्रकल्प) ,तापी नदीवरील सर्व धरण,गिरणा खोरे, नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प, उकाई-पांझरा- गिरणा लिंक प्रकल्प नार-पार नदीजोड प्रकल्प, मांजरपाडा-१ व २ प्रकल्प,वांजुळपाणी प्रकल्प,व इतर प्रकल्पांवर विचारमंथन व जनजागृती होणार आहे.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन एन.एम.भामरे यांनी केले.दिपक पाटील यांनी आभार मानले. आयटीसेल प्रमुख विनोद भानुशाली हे ऑनलाईन यात्रेसाठी तांत्रिक सहकार्य केले.






