Amalner

?️ Breaking News…अवैध वाळू करणाऱ्यांची मुजोरी वाढली..महसूल पथका वर हल्ला…महसूल पथकातील कर्मचारी जखमी

?️ Breaking News…..अवैध वाळू करणाऱ्यांची मुजोरी वाढली। महसूल पथका वर हल्ला…महसूल पथकातील कर्मचारी जखमी

अमळनेर : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडायला गेलेल्या पथकावर बेटावद येथील वाळू चोरांनी लोखंडी रॉड व पावडीच्या दंडक्याने, दगडांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना भरवस गावाजवळ रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी नेमलेल्या पथकातील तलाठी प्रथमेश पिंगळे , हर्षवर्धन मोरे , धीरज देशमुख , आशिष पारधी , पुरुषोत्तम पाटील , स्वप्नील कुलकर्णी, पिंटू चव्हाण , जे ए जोगी हे भरवस गावाकडे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच भरवस गावाकडे गेले असता गावापुढे रेल्वे पुलाच्या अलीकडे त्याना बेटावद येथील बबलू राजेंद्र तायडे हा व त्याच्या सोबत 7 ते 8 जण ट्रॅक्टरवर वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.

?️ Breaking News...अवैध वाळू करणाऱ्यांची मुजोरी वाढली..महसूल पथका वर हल्ला...महसूल पथकातील कर्मचारी जखमी

पथकाने त्यांना पकडण्याचे प्रयत्न करतात बबलू तायडे यांच्यासह इतरांनी धीरज देशमुख यांच्या डोक्यावर पावडी च्या दांडक्याने हल्ला केला तसेच हर्षवर्धन मोरे व आशिष पारधे यांच्यावर देखील लोखंडी रॉड ने पायांवर हल्ला केला आणि इतरांनी दगडांनी हल्ला केला तलाठ्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि पथकातील मागे असलेल्या तलाठ्यांना कळवले त्या गडबडीत पी एस पाटील यांची मोटरसायकल घसरून पडली त्यांच्या डोक्याला मार लागला त्यांच्या डोक्याला 8 टाके पडले आहेत तेवढ्यात हल्लेखोर धीरज देशमुख यांच्या मोटरसायकलची किल्ली घेऊन पळून गेले अशी आपबीती तलाठ्यांनी कथन केली घटनेची माहिती कळताच प्रांताधिकारी सीमा आहिरे , तहसिलदार मिलिंद वाघ यांनी भेट दिली जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले होते रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू होती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button