कोरोनामुळे तोरी बसवण्णा यात्रेवर ही विरजण
महेश हुलसूरकर, हुलसुर कर्नाटक
कर्नाटक : हुलसूर येथील ५ कि.मी.अंतरावर असलेल्या मांजरा नदीच्या तीरावर तोरी बसवण्णा हे आंध्रा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातुन मोठ्या श्रध्देने भाविक भक्त याठिकाणी दर्शनासाठी मकरसंक्रात च्या दुसर्या दिवशी करी दिवशी भव्य स्वरूपात एक दिवस यात्रा भरते भाविक मांजरा नदी मध्ये स्नान करून तोरी बसवण्णा याचे दर्शन घेतले जाते व महाप्रसाद होतो यंदा वर्षी मात्र कोरोनामुळे यात्रेवरती विरजण पडल्या सारखे झाले आहे सोशल डिस्टंट ठेवून मंदिरात लांबुनच दर्शन व मंदिर परिसरात एक ही दुकान चालू ठेवण्यात आले नाही महाप्रसाद हा मोजक्याच प्रमाणात ठेवण्यात आला होता.
यावेळी बसवकल्याण चे माजी आमदार भगवंत खुबा यानी तोरी बसवण्णाला भेट देऊन पुजा केली उपस्थित तोरी बसवण्णा पंच कमिटी अध्यक्ष व जि.पं.सदस्य सुधीर काडादी, उपध्यक्ष देवेंद्र भोपळे, पुजारी बस्वराज स्वामी, अमित स्वामी, ओबीसी जिल्हा मोर्चा अध्यक्ष अनिल भुसारे, लता हारकुडे, अशोक वखारे, संगमेश कुडुबंले, रुद्राप्पा कुडुबंले, विश्वनाथ, काशिनाथ कवटे, सिद्राम बिरगे,सुभाष आतार, गदगय्या मठपती, सुनील भुजुगे, कलाश पारशेट्टे आदी होते.






