सुदिप ने इमानदारी दाखवत सापडलेले 6000 रु केले परत सर्वत्र परिसरात त्याचे कौतूक
रजनीकांत पाटील अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी नारायण भगवान पाटील हे आपल्या नेहमीच्या कामानिमित्त सकाळी घरातून बाहेर पडले असता खिशात रक्कम 6000 हजार रुपये असल्याचा भान त्याना राहीला नाही रस्त्याने जात असताना अचानक खिश्यातुन पैसे पडले असल्याचे जाणवले त्यांनी घरी फोन केला असता अनावधानाने घरीच पडले असतील या आशेने घरातुन नकार येताच त्यानी सभोवताली परिसरात शोधा शोध केली असता पैसे काही सापडले नाल्याने त्यानी नाराजी व्यक्त करत ते घराकडे वळले.
तसेच घरी गेले असता गल्लीतील सुदीप संभाजी पाटील हा 10 वी शिकणारा मुलगा मु पो कुरंगी हा आपल्या मामाकडे शिरूड येते लॉकडाउन सुट्टी घालवायला आला असता त्या तरुणाला सापडेल असल्याचे समजले त्या तरुणाने संपूर्ण परिसरात विचारपूस केली काही वेळाने समजले असता सदर रक्कम नारायण पाटील यांची असल्याचे कळले सुदीप या तरुणाने आपली इमानदारी दाखवत 6000 रु रक्कम नारायण पाटील यांच्या घरी जाऊन परत केली असता संपूर्ण परिसरातुन त्याचे कौतूक करण्यात आले.






