पारोळा भुईकोट किल्ल्याच्या विहिरीत 12 वर्षाचा मुलाचा पडून मृत्यु
पारोळा (प्रतिनिधी) कमलेश चौधरी
पारोळा येथील भुईकोट किल्ल्यात तुटलेली पतंग पकडताना पाय घसरून सुदर्शन नगर पारोळा येथील बारा वर्षे विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला मंगळवार दिनांक 19 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गोपाळ याच्या मृत्यू झाला.घडलेल्या घटनेनुसार मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव गोपाळ गोविंद मरसाळे वय १७ शिक्षण शिवाजी हायस्कूल पारोळा येथे आठवीत शिक्षण घेत होता. गुजरात प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा मकरसंक्रांती निमित्त पतंग उडविण्यात येते परंतु त्याची सुरुवात एक ते दीड महिन्याच्या अगोदर महाराष्ट्रात होत असते घडलेल्या दिवशी पारोळा येथील भुईकोट किल्ल्यात गोपाल गोविन्द मरसाळे व त्याचा भाऊ राकेश गोविंदा मरसाळे वय १३वर्षे हे दोघे शिवाजी हायस्कूल पारोळा येथे शिक्षण घेत होत.ते दोघे भुईकोट किल्ल्याच्या आतील पटांगण मोठे असल्याने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तुटलेली पतंग पकडण्याच्या प्रयत्नात पळत असताना भुईकोट किल्ल्याच्या आतील असलेल्या जमीनदोस्त विहिरीत वरती पतंग कडे बघत पळत असताना अरुंद अशा विहिरीत पाय घसरून पडला.पावसामुळे त्या विहिरीच्या आजूबाजूला गवत उगवले असल्याने ती विहीर लक्षात न आल्यान विहिरीत पाय घसरून पडला.ते त्याच्या भावाच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड केला व किल्ल्याच्या प्रवेशद्वारा बाहेरील लोकांकडे विनवणी केली व घडलेल्या घटनेची माहिती सांगितली.त्यानुसार लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अंधार होत असल्याने नगराध्यक्ष करण पवार यांनी विद्युत दिव्याची सोय केली व तरबेज अश्या पोहोणाऱ्यांना पाचारण केले वीहीरीची लांबी,रुंदी कमी असून वर्षानुवर्षे साचलेल्या पावसामुळे त्यात घाण पडलेलीे साचलेली असल्यामुळे डासांच्या उपद्रवामुळे गोपाल याची लोखंडी बिलाईचे सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.घटनास्थळी गोपालचीआई नकुबाई गोविंद मरसाळे हिचा एकच आक्रोश होता.या भुईकोट किल्ल्यात अश्याप्रकारच्या२० ते २५ विहिरी आहेत.घटनेमुळे पारोळा वासी यांकडून यांकडून पुरातन विभाग या भुईकोट किल्ल्यात कडे लक्ष देईल काय ?अशी एकच गोष्ट बोलली जात आहे.त्यानंतर गोपाल यास कुटीररुग्णालय पारोळा येथे दाखल करण्यात आला. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.पारोळा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या अध्यक्षते खाली पोलीस कान्स्टेबल बापू पाटील हे करीत आहेत.






