Kolhapur

भाजपाच्या वतीने मालुबाईना मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून मिळाले अनमोल सहकार्य

भाजपाच्या वतीने मालुबाईना मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून मिळाले अनमोल सहकार्य

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : कासारवाडा ता. राधानगरी येथील श्रीमती मालुबाई ज्ञानदेव शिंदे यांच्या ऱ्हदयरोग उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतुन २५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नातुन हा निधी मंजूर झाला असून भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील व भाजपा युवक नेते गारगोटी ग्रा.प. सदस्य अलकेश कांदळकर यांचे हस्ते त्यांचा मुलगा तानाजी ज्ञानदेव शिंदे यांचेकडे मदत निधीचा धनादेश गारगोटी येथे सुपूर्त करण्यात आला..
या कामासाठी भाजपाचे आरोग्य मित्र सचिन घरपणकर, वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे राहुल चौगले राधानगरी भाजपाचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे यांचे सहकार्य लाभले..
या मदतनिधीमुळे श्रीमती मालुबाई शिंदे यांचे वर सनशाईन हॉस्पीटल राजारामपूरी कोल्हापूर येथे योग्य उपचार झाले आहेत अशी माहिती तानाजी शिंदे यांनी दिली…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button