तळेगाव दिंडोरी येथे आझादी गौरवपदयात्रा संपन
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी तालुका काँग्रेसच्या वतीने तळेगाव येथे आझादी गौरव पदयात्रा तालुका अध्यक्ष श्री.सुनिल आव्हाड कार्याध्यक्ष श्री.वाळू पा.जगताप यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली सर्वप्रथम शहिद यशवंत ढाकणे यांच्या स्मारकास पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते दिंडोरी तालुक्यातील मा.सैनिक श्री.भारत खांदवे श्री.भास्कर खांदवे,श्री. सूर्यवंशी,श्री.बाळकृष्ण कांगणे यांना शाल,श्रीफळ,पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.सर्व कार्यकर्त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी ज्यांनी रक्ताचे बलिदान करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आशा थोर पुरुषांविषयी व वीर जवानांविषयी आदरभाव व्यक्त केला.व सर्वांनी वंदे मातरम,व भारत मातेचा जयघोष केला.कार्यक्रमासाठी श हराध्यक्ष.गुलाब जाधव,प्रांतिक सदस्य प्रकाश पिंगळ,नामदेव राऊत,कचरू गांगुर्डे,शांताराम खांदवे,दिलीप शिंदे,बाळू चकोर,दत्तात्रय ढाकणे, पोलीस पा. रोशन परदेशी,जहीर शेख,चव्हाण साहेब,चिंतामण खांदवे,शिवाजी बोराडे,द्वारकानाथ खांदवे,साहेबराव ढाकणे,भास्कर चारोस्कर,शरद बोराडे,किसन कथार,राजाभाऊ ढाकणे,अण्णा तांबडे,अनिल घुगे,बाळासाहेब ढाकणे आदी उपस्थित






