Chalisgaon

शासकीय ग्रामीण रुग्णालयात पोलिओ लसीकरण मोहीम

शासकीय ग्रामीण रुग्णालयात पोलिओ लसीकरण मोहीम

चाळीसगाव मनोज भोसले

१९ जानेवारी रोजी देशभर पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आज सकाळी शासकीय ग्रामीण रुग्णालयात जाऊन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी लहान बालकांना पोलिओ ची लस देऊन पोलिओ लसीकरण मोहीमेची सुरुवात केली.
यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, दवाखान्यातील डॉक्टर्स, अधिकारी, परिचारीका, पालक व कार्यकर्ते उपस्थित होते.शासकीय ग्रामीण रुग्णालयात पोलिओ लसीकरण मोहीमपोलिओ म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. हा बहुतकरून 2 वर्षाखालील मुलांना होतो. काही देशांत हा रोग टिकून आहे. सुधारलेल्या देशांमधून लसींमुळे आणि मुख्यतः राहणीमान सुधारल्याने तो नष्ट झाला आहे. पाच वर्षे वयापर्यंतच्या लस न दिलेल्या सर्व मुलांना- विशेषतः पावसाळयात याच्यापासून धोका असतो. हा आजार झालेली 80 टक्के मुले एक ते दोन वर्षे गटातील असतात.जिथे सांडपाणी, मैला यांची नीट विल्हेवाट होत नाही व पिण्याचे पाणी अशुध्द असते. तिथे याचा धोका असतो. म्हणूनच हा रोग टाळायचा असेल तर सर्व मुलांना पोलिओ लस (डोस) देणे व पाणी शुध्द ठेवणे, मैला-पाण्याची योग्य विल्हेवाट व स्वच्छता राखणे आवश्यक आहे.यावेळी कुटुंबातील ५ वर्षाच्या आतील बालकांना आज आपल्या जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओ डोस देण्याचे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.#पोलिओ_लसीकरण_मोहीम #१९_जानेवारी_२०२०

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button