समर्जीतसिंह घाटगे यांनी केली गरीबाघरची दिवाळी गोड.
तुकाराम पाटील -कोल्हापूर
मातंग समाजातील लोकांना दिपावली निमीत्त केले मिठाई वाटप केली
आपल्या बरोबर गोर गरीबांची ही दिवाळी चांगली गेली पाहिजे ही इच्छा मनाशी बाळगून ,नुकत्याच पार पडलेल्या व कागल विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणुन लढलेले उमेदवार राजे समर्जीतसिंह घाटगे यांनी आज गडहिंग्लज येथिल मातंग समाज बांधवांची भेट घेऊन मिठाई चे वाटप केले.
यावेळी त्यांचे सोबत माजी उपनगराध्यक्ष सुनिल गुरव,रामदास कुराडे,भिमा कोमारे,राहिल खलीफ,चंद्रकांत सावंत.हे उपस्थित होते.
विधानसभा सभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी असूनही गडहिंग्लज शहराने चांगले मतदान दिले.मतदारांचे आभार मानावे व गडहिंग्लज वासीयांना दिवाळी शुभेच्छा द्याव्यात या उद्देशाने ही भेट होती.
निवडणूकित हार होऊनही राजे समर्जीतसिंह घाटगे दिपावली सनादिवशी गडहिंग्लज येथे मतदार यांचे आभार मानण्यासाठी आले,ते सर्वाना भेटले.मातंग समाजामध्ये जाऊन मातंग बांधवांना भेटून त्यांना मिटाई चे वाटप केले.त्यांचेशी समरस झाले.हे आजपर्यंत कधीही झाले नाही याची चर्चा शहरात होती






